काळाचा घाला! बंगळुरू-शिवमोगा बसचा भीषण अपघात; कंटेनर धडकून आग, 17 प्रवासी जिवंत जळाले!

karnataka bus fire accident chitradurga 17 dead nh48 : कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात आज, गुरुवारी २५ डिसेंबर रोजी पहाटे काळाने मोठा घाला घातला. राष्ट्रीय महामार्ग ४८ (NH-48) वर एका खाजगी ट्रॅव्हल्सची बस आणि मालवाहू ट्रक (लॉरी) यांच्यात झालेल्या भीषण धडक झाली. या घटनेनंतर बसला भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत किमान १७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

karnataka bus fire accident chitradurga 17 dead nh48

नेमकी कशी घडली दुर्घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, ही खाजगी बस (MK Travels) बंगळुरूहून शिवमोगाच्या दिशेने जात होती. राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील हिरियुर तालुक्यातील गोरलाथू क्रॉस जवळ आली असता, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कंटेनर लॉरीने वेगावरील नियंत्रण गमावले. ही लॉरी थेट दुभाजक ओलांडून बसला समोरासमोर धडकली. धडक इतकी वेगवान होती की बसच्या डिझेल टँकचा स्फोट झाला आणि प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळण्याआधीच संपूर्ण बस आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाली.

कुठे घडला अपघात?

गोरलाथू क्रॉस, हिरियूर तालुका, चित्रदुर्ग जिल्हा (NH-48) येथे आज गुरुवार, २५ डिसेंबर २०२५, पहाटेची वेळी हा अपघात घडला, प्राथमिक अंदाजानुसार १७ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. दरम्यान, अनेक प्रवासी गंभीर जखमी असून त्यांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बचावकार्य आणि पोलीस तपास

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यात आली असून बसचा सांगाडा कापून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून जखमींना तातडीने उपचार मिळवून देण्याला प्राधान्य दिले जात आहे.

प्रवाशांची माहिती आणि मृतांचा आकडा

बसमधे एकूण २९ प्रवासी प्रवास करत होते, ज्यात १५ महिला आणि १४ पुरुषांचा समावेश होता. यातील बहुतेक प्रवासी हे गोकर्ण, कुमटा आणि शिवमोग्गा येथील रहिवासी होते. १७ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे हा आकडा वाढण्याची भीती आहे.

बसमधील प्रवाशांची नावे

वनइंडिया इंग्लिशला प्राप्त माहितीनुसार, बसमध्ये मंजुनाथ, संध्या, शशांक, दिलीप, प्रेथीश्वरन, व्ही बिंदू, के कविता, अनिरुद्ध बॅनर्जी, अमृता, ईशा, सूरज, मनसा, मिलना, हेमराजुमर, कल्पना प्रजापती, एम शशिकांत, विजय भंडारी, नवीन, अभिषेक आणि एच किरण पॉल हे प्रवासी प्रवास करत होते.

"हा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. धडक झाल्यानंतर डिझेल टँक फुटल्यामुळे आग वेगाने पसरली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. आम्ही तपास करत आहोत." - स्थानिक पोलीस अधिकारी

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+