कोण होणार झारखंडचा मुख्यमंत्री?, कोणाचे नाव आघाडीवर, जनतेचा पाठिंबा कुणाला?, सर्व्हेतून आले समोर!
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार सोमवार, 11 नोव्हेंबर रोजी संपला. पहिल्या टप्प्यात झारखंडमधील एकूण 81 जागांपैकी 43 जागांवर 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान, झारखंडमध्ये मतदानापूर्वी एक सर्वेक्षण समोर आले असून यात मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे कोण आघाडीवर आहे, याचा खुलासा समोर आला आहे.
मॅटराइज सर्व्हेच्या माध्यमातून झारखंडमधील जनतेकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला पसंदी देण्यात आली, याचा खुलासा समोर आला आहे. चला तर जाणून घेऊया या सर्वेतील महत्त्वाचे मुद्दे अन् लोकांनी कोणाला दिली सर्वाधिक पसंती.

झारखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण
जनतेची पहिली पसंती?
मॅटेराइज संस्थेच्या सर्वेक्षणानुसार सामान्य जनतेने बाबुलाल मरांडी यांना मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती म्हणून घोषित केले आहे. विशेष म्हणजे हेमंत सोरेन लोकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसत नाही. हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्री म्हणून लोकांनी फारसा रस दाखवला नाही. झारखंडमध्ये मतदानापूर्वी सर्वेक्षणाचा हा खुलासा निवडणूक अधिक रंजक बनवत आहे. बाबूलाल मरांडी हे राज्यातील नेत्यांपैकी लोकप्रिय आहेत.
एकूण 63 हजार लोकांचा समावेश
15 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण झारखंडमध्ये मॅटिराइज संस्थेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. झारखंडमधील 63,842 लोकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला. या क्रॉस-सेक्शनमध्ये 30,000 पेक्षा जास्त पुरुष, अंदाजे 21,000 महिला आणि 11,000 तरुणांचा समावेश होता. सर्वेक्षणात 44 टक्के लोकांनी बाबुलाल मरांडी यांना मुख्यमंत्री म्हणून आपली पहिली पसंती असल्याचे सांगितले, तर 30 टक्के लोकांनी हेमंत सोरेन यांना पसंत केले.
सर्वेक्षण : कोणत्या पक्षाला किती जागा?
सर्वेक्षणात जागा वाटप आणि मतांची टक्केवारी यांचाही अंदाज आहे, जे सुचवते की भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला 45 ते 50 जागा मिळू शकतात. झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) च्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लॉक 18 ते 25 जागा जिंकू शकतो, तर इतर पक्षांना 2 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे.
भाजप युतीला 53 टक्क्यांहून अधिक मते मिळण्याची अपेक्षा आहे, तर जेएमएम-काँग्रेस आणि आरजेडी युतीची एकत्रित मते 27.9 टक्के असू शकतात.
इतर पक्षांना 18.9 टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांपेक्षा हा अंदाज पूर्णपणे वेगळा आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जेएमएमच्या नेतृत्वाखालील आघाडीने 47 जागा जिंकल्या होत्या आणि एनडीएने 25 जागा जिंकल्या होत्या.












Click it and Unblock the Notifications