झारखंडच्या गोड्डामध्ये राहूल गांधी एकटेच हेलिकॉप्टरमध्ये बसून, नेमक काय घडला प्रकार
Jharkhand Assembly Election 2024 : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी झारखंडच्या प्रचारात व्यस्त आहेत. निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधी शुक्रवारी झारखंडमधील गोड्डा येथे पोहोचले. पण एटीएसने त्यांच्या हेलिकॉप्टरला येथून उड्डाण करू दिले नाही. मिळालेल्या माहीतीनुसार उड्डाण करण्यास परवानगी न मिळाल्याने त्याच्या हेलिकॉप्टरला हेलिपॅडवर थांबवून राहावं लागलं.
राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरचे फुटेजही समोर आले आहे. ज्यामध्ये राहुल गांधी हेलिकॉप्टरच्या आत बसून आहेत. त्याचवेळी हेलिपॅडभोवती सुरक्षा कर्मचारीही उभे असल्याचे दिसून येत आहे. गोड्डा येथील महागामा येथे राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला एटीसीकडून ग्रीन सिग्नल मिळाला नाही. त्यामुळेच त्यांचे हेलिकॉप्टर उडू शकले नाही. अशा स्थितीत राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला चारही बाजूंनी कमांडो उभे आहेत .

दरम्यान काँग्रेसने आता या मुद्द्यावर भाजपला जबाबदार धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला परवानगी देण्यात आली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 13 नोव्हेंबरला पूर्ण झालं. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. दुस-या टप्प्याच्या झारखंड निवडणुकीसंदर्भात एनडीए आघाडी आणि कॉंग्रेस आघाडीचे नेते झारखंडमध्ये प्रचारासाठी लगबग सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राहूल गांधी प्रचारासाठी झारखंड पोहोचले होते. जिथे त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला.
#WATCH झारखंड: कांग्रेस सांसद और लोकसभा नेता प्रतिपक्ष राहुल गांधी के हेलिकॉप्टर को ATC से मंजूरी न मिलने के कारण महागामा से उड़ान भरने से रोक दिया गया। pic.twitter.com/kUSIxrj0xe
— ANI_HindiNews (@AHindinews) November 15, 2024












Click it and Unblock the Notifications