JK Grenade Attack: दहशतवाद्यांचा श्रीनगरच्या संडे मार्केटमध्ये ग्रेनेड हल्ला, अनेक लोक जखमी
Jammu Kashmir Grenade Attack : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. श्रीनगरमधील टुरिस्ट रिसेप्शन सेंटर (TRC) जवळ रविवारी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यात किमान दहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. हा स्फोट गजबजलेल्या संडे मार्केटमध्ये झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या स्फोटाचा फटका मार्केटमधील गर्दीला बसला असून यामध्ये सुमारे 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

जम्मू-काश्मीर खोऱ्यात सततच्या त्रासानंतर आता दहशतवादी निष्पाप लोकांना लक्ष्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कर आणि पोलीस संयुक्तपणे कारवाई करत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या दहशतवाद्यांनी रविवारी श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला केला आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना एसएचएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर घटनास्थळी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. तसेच दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला होता. या हल्ल्याशी संबंधित अधिक माहिती गोळा करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
#WATCH | Jammu and Kashmir: Militants hurled grenade at TRC, Sunday market in Srinagar. More details awaited. pic.twitter.com/PTYR2Ud0x2
— ANI (@ANI) November 3, 2024
या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. 'श्रीनगरच्या 'संडे बाजार'मध्ये निरपराध दुकानदारांवर ग्रेनेड हल्ल्याची आजची बातमी अतिशय अस्वस्थ करणारी आहे. निरपराध नागरिकांना लक्ष्य करण्याचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. सुरक्षा यंत्रणेने लवकरात लवकर हल्ले थांबवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून लोक कोणत्याही भीतीशिवाय आपले जीवन जगू शकतील', असं ट्टिट केलं आहे.
The last few days have been dominated by headlines of attacks & encounters in parts of the valley. Today’s news of a grenade attack on innocent shoppers at the ‘Sunday market’ in Srinagar is deeply disturbing. There can be no justification for targeting innocent civilians. The…
— Omar Abdullah (@OmarAbdullah) November 3, 2024












Click it and Unblock the Notifications