Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Jagannath Rath Yatra 2025:भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी! 3 भाविकांचा मृत्यू, 50 जखमी

Jagannath Rath Yatra 2025 Stampede : चार धामपैकी एक महत्वपुर्ण धाम असलेल्या पुरी धाममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी झाली असून 3 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक भाविक जखमी झाल्याचे वृत्त असून आतापर्यंत 50 जण जखमी झाल्याचा आकडा समोर आला आहे. ही दुर्घटना आज 29 जून 2025 रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.

इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार, रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. भाविक श्री गुंडीचा मंदिरासमोर मोठ्या संख्येने भगवान जगन्नाथांचे दर्शन घेण्यासाठी जमले होते. या दरम्यान, धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली, ज्यामध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर 10 हून अधिक लोक जखमी झाल्याचे या वत्तात म्हटले आहे.

Jagannath Rath Yatra 2025 Stampede

जखमींवर पुरीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार

रथयात्रेतील चेंगराचेंगरीतील जखमींना तात्काळ पुरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर ठोस उपाय केले जात असून त्यापुर्वीही प्रशासनाने उपाय केले होते, मात्र यावेळी भाविकांची संख्या खूपच जास्त असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आली आहे.

600 भाविक आजारी, कारण काय?

प्राप्त माहितीनुसार, शनिवारीही 600 हून अधिक भाविक आजारी पडल्याचे वृत्त आहे, त्यापैकी काही धक्क्यामुळे तर काही उष्णता आणि उन्हामुळे आजारी पडले आहेत. जगन्नात पुरीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पुरीमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एक टीम देखील तैनात आहे.

नियोजन असूनही चेंगराचेंगरी?

एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत पुरी जिल्हा प्रशासनाने 2025 च्या रथयात्रेदरम्यान सुरक्षा, देखरेख आणि वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. सर्व विधी नियोजित कार्यक्रमानुसार पार पडत आहेत. असे असूनही, आज सकाळी चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.

चेंगराचेंगरीत पत्नी गमावलेल्या एका व्यक्तीने म्हटले आहे की, "ही घटना घडली तेव्हा कोणीही प्रतिसाद दिला नाही, ना अग्निशमन दलाचे अधिकारी, ना बचाव पथक, ना रुग्णालयाचे पथक. ही एक दयनीय घटना आहे जी शब्दात व्यक्त करता येत नाही..."

हेही वाचा : Rath Yatra 2025 : जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत सुरक्षा कशी असणार?, सुरक्षेसाठी AIचा कसा वापर होणार?

हेही वाचा : Jagannath Rath Yatra 2025 : रथयात्रेत तीन रथ का निघतात?, त्या रथांचा इतिहास काय आहे?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+