भारतीयच नव्हे परदेशी लोकही 'हरे कृष्ण हरे राम' चा करतात जप! इस्कॉन मंदिराशी संबंधित या 10 खास गोष्टी
Iskon temple : बांगलादेशातील अनागोंदी एकीकडे सुरुच असतानाच तेथील इस्कॉन मंदिर सतत चर्चेत असतात. ताज्या अपडेटमध्ये, हिंदू अध्यात्मिक संघटना इस्कॉनने हिंदू भिक्षू चिन्मय कृष्ण दास यांच्यापासून स्वतःला दूर ठेवल्याचा दावा फेटाळला आहे.
बांगलादेश सरकारने कृष्णा दास यांना अटक करून तुरुंगात टाकले होते. यानंतर इस्काॅनने दास यांना पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले होते आणि देशातील हिंदूंच्या हक्कांचे रक्षण करण्याचे आवाहन केले होते.

"इस्कॉनने हिंदूंच्या आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेसाठी शांततेने आवाहन करणारे चिन्मय कृष्ण दास यांच्या हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे समर्थन करण्यापासून दूर राहिले नाही आणि ना राहणार" असे संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे.
यादरम्यान, कृष्ण भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या इस्कॉन मंदिराविषयीच्या 10 खास गोष्टी जाणून घेऊया, ज्याबद्दल प्रत्येकासाठी जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
इस्कॉन मंदिराविषयीच्या 10 खास गोष्टी
- इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजेच इस्कॉनची स्थापना 1966 मध्ये श्रील प्रभुपाद यांनी केली होती. त्यांचा जन्म कोलकाता येथे झाला. ते भगवान कृष्णाचे महान भक्त होते आणि त्यांनीच 1965 मध्ये 'हरे कृष्ण चळवळ' सुरू केली.
- भगवद्गीता आणि वैदिक शास्त्रांनुसार अध्यात्म आणि भक्तीचा प्रसार करणे हा त्याचा उद्देश होता आणि तो उद्देश बऱ्याच अंशी पूर्ण झाला आहे.
- निवृत्तीनंतर त्यांनी 'हरे कृष्ण, हरे राम'चा प्रचार जगभर केला.
- जगभरात 1000 हून अधिक इस्कॉन मंदिरे आहेत. यातील काही मंदिरे त्यांच्या वास्तू आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहेत.
- लंडन, बर्लिन आणि न्यूयॉर्कमध्ये भगवान कृष्णाचे अनेक भक्त सापडतील.ते इस्कॉन मंदिरात नियमितपणे जातात.
- सर्व इस्कॉन मंदिरे भगवान कृष्ण आणि राधेला समर्पित आहेत. जिथे रोज हरिनाम संकीर्तन आणि भजन-कीर्तन होतात.
- मंदिरात येणाऱ्या भाविकांना मोफत प्रसाद दिला जातो. याशिवाय, इस्कॉनच्या फूड फॉर लाइफ योजनेअंतर्गत गरजूंना अन्न पुरवले जाते.
- भगवद्कथा, श्रीमद भागवत आणि भगवद्गीतेतील शिकवणी मंदिरांमध्ये नियमितपणे दिली जातात.
- मंदिरांमध्ये फक्त शुद्ध शाकाहारी जेवण तयार करून वितरित केले जाते. देवाला अर्पण केल्यानंतर ते भक्तांमध्ये वाटले जाते.
- इस्कॉनचे मुख्यालय मायापूर (पश्चिम बंगाल) येथे आहे. येथे भक्त श्री चैतन्य महाप्रभूंच्या तत्त्वांचे पालन करतात.
टीप : ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या गृहीतकांवर आणि माहितीवर आधारित आहे. OneIndia लेखाशी संबंधित कोणत्याही इनपुट किंवा माहितीची पडताळणी करत नाही, त्यामुळे कोणतीही माहिती लागू करण्यापूर्वी, कृपया एखाद्या जाणकार ज्योतिषी किंवा पंडित यांचे मत घ्या.












Click it and Unblock the Notifications