IRCTC Diwali Chhath Special Train Booking : दिवाळीला घरी जायचंय? रेल्वे घेऊन आलीय जबरदस्त ऑफर! वाचा
IRCTC Diwali Chhath Special Train Booking Get 20 percent Off : दिवाळी आणि छठ म्हणजे घरची आठवण आणि गावी जाण्याची लगबग. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी (21 ऑक्टोबर) आणि छठ (25 ते 28 ऑक्टोबर) या सणांसाठी रेल्वे तिकीटांची प्रचंड मागणी असणार आहे, पण यावेळी रेल्वेने प्रवाशांसाठी एक खास सुविधा आणली आहे. दिवाळी-छठसाठी तिकीट बुकिंग सुरू झाली असून, रेल्वेने पहिल्यांदाच 'राउंड ट्रिप पॅकेज' सुरू केलं आहे. या नव्या योजनेमुळे प्रवाशांच्या पैशांची मोठी बचत होणार आहे.
गावाकडे जाण्याची प्रत्येकाला आस असते, त्यातच दिवाळी आणि इतर सण असतील तर गावी जाणे आवश्यकच असते, पण अनेक जणांना आरक्षण मिळत नाही किवा गर्दी असते म्हणून हिरमोड होतो, जर तुम्हीही या सणांना गावी जायचा विचार करत असाल, तर या ऑफरचा फायदा घेऊन आताच तुमचं तिकीट बुक करा!

काय आहे ही खास ऑफर?
रेल्वेने सुरू केलेल्या या राउंड ट्रिप पॅकेजमध्ये तुम्हाला जाण्या-येण्याचं तिकीट एकाच वेळी बुक केल्यास 20% पर्यंत सूट मिळणार आहे. ही ऑफर 14 ऑगस्ट 2025 पासून उपलब्ध असून, त्याचा फायदा घेण्यासाठी काही नियम आहेत.
जाण्याची तारीख: 13 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान.
परतीची तारीख: 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 दरम्यान.
- दोन्ही तिकीटं एकाच प्रवाशासाठी, एकाच स्टेशनसाठी आणि एकाच क्लाससाठी बुक करावी लागतील.
- केवळ कन्फर्म तिकीटांवरच ही सूट मिळेल आणि ती तिकीटं रिफंड किंवा बदलता येणार नाहीत.
- फ्लेक्सी-फेअर ट्रेनवर ही योजना लागू नाही.
- ही तिकीटं तुम्ही IRCTC च्या वेबसाइटवरून किंवा रेल्वे तिकीट काउंटरवरून बुक करू शकता.
स्पेशल ट्रेन आणि गर्दीचे मार्ग
दिवाळी आणि छठला मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद यांसारख्या शहरांतून बिहार आणि उत्तर प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. ही गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने 12 हजारांहून अधिक स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये काही प्रमुख स्पेशल ट्रेन्स अशा आहेत.
या आहेत रेल्वेसेवा..
- गोंदिया - पटना स्पेशल (08795/08796): 19 ऑक्टोबरपासून.
- चार्लापल्ली - रक्सौल साप्ताहिक स्पेशल (07051/07052): 4 ऑक्टोबरपासून.
- गोंदिया - पटना छठ स्पेशल (08897/08898): 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान.












Click it and Unblock the Notifications