International Yoga Day 2025 : योग शांतीचा मार्ग, पंतप्रधान मोदींचे भाषण 5 मुद्द्यात समजून घ्या

International Yoga Day 2025 : जागतिक योगदिनाच्या कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टनम् येथे सहभाग घेतला, यासह त्यांनी या दिनानिमित्त केलेल्या भाषणात योग दिनाचे महत्न आणि योगाचे महत्व जगाला समजले असून योग शांतीचा मार्ग असून अस्थीर जगात आता लोक योगाकडे वळत आहे. योग दिनाचा कार्यक्रम जगातील 191 देशातील 1300 ठिकाणी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आज, 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन असूनया वर्षीची थीम "एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग" आहे. आज पंतप्रधान मोदी विशाखापट्टणममध्ये आहेत. 'आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त त्यांनी खास भाषण केले असून या भाषणातील महत्वाचे मुद्दे आपण समजून घेऊया.

International Yoga Day 2025

गेल्या दशकातील योगाच्या प्रवासाकडे पाहताना मला बरेच काही आठवते. ज्या दिवशी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जावा असा प्रस्ताव मांडला: पंतप्रधान मोदी त्यानंतर 175 देश आमच्या प्रस्तावाला उभे राहिले, आजच्या जगात असा पाठिंबा देणे ही सामान्य घटना नाही, मानवतेच्या कल्याणासाठी जगाचा सामूहिक प्रयत्न होता.

1. योग हा लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग हा लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनला असल्याचे म्हटले आहे. एक वर्षाचा मागोवा घेतल्यास योग हा जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे. दिव्यांग मित्र ब्रेल लिपीत योग शास्त्रांचा अभ्यास करतात तेव्हा मला अभिमान वाटतो. शास्त्रज्ञ अंतराळात योग करतात. तरुण मित्र गावांमध्ये योग ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतात. या सर्व नौदल जहाजांवर एक उत्कृष्ट योग कार्यक्रम आयोजित केला जात आहे.

2. योग सर्वांसाठी आहे..

योग सर्वांसाठी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सीमा, पार्श्वभूमी आणि क्षमतांच्या पलीकडे योग आहे. ऑपेरा हाऊसच्या पायऱ्या असोत की, एव्हरेस्टचे शिखर असो किंवा महासागराचा विस्तार योगाचा संदेश सर्वत्र सारखाच आहे. योग सर्वांसाठी आहे.

3.जगात अस्थिरता मनात तणाव

पंतप्रधान मोदी म्हणाले, दुर्दैवाने, आज संपूर्ण जग तणावातून जात आहे, अनेक क्षेत्रांमध्ये अशांतता आणि अस्थिरता वाढत आहे. अशा वेळी, योग आपल्याला शांतीची दिशा देतो. योग हा एक शांतीचा मार्गअसून पाॅज बटन आहे. योग मानवतेला श्वास घेण्यासाठी, संतुलन शोधण्यासाठी आणि पुन्हा पूर्ण होण्यासाठी आवश्यक आहे.

4. योग आरोग्यमित्र...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात योग आणि आरोग्याबाबत महत्व अधोरेखित केले. हृदय आणि मज्जातंतू विकारांच्या उपचारांमध्ये योग महत्त्वाची भूमिका बजावतो असे ते म्हणाले. जगात योगाचा विस्तार करण्यासाठी, भारत आधुनिक संशोधनाद्वारे योगाचे विज्ञान मजबूत करत आहे. आम्ही योगाच्या क्षेत्रात पुराव्यावर आधारित औषधांना देखील प्रोत्साहन देत आहोत असेही त्यांनी म्हटले.

5. मानसिक आरोग्य आणि योग

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, योगाच्या क्षेत्रात औषधींसंदर्भात दिल्ली एम्सने चांगले काम केले आहे. त्यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि मज्जातंतू विकारांवर उपचार करण्यात योगाची महत्त्वाची भूमिका आहे, तसेच महिलांच्या आरोग्य आणि मानसिक आरोग्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावते.

तेल आहारातून कमी करा

तुम्ही आहारात तेल जे वापरत आहात त्याची मात्रा कमी करावी लागेल. कारण तेलामुळे शरीर जाड होते ही समस्या आता जगाता आहे. मन की बातमध्ये मी तेलाचे सेवन दहा टक्क्यांनी कम करा असे म्हटले होते, त्यामुळे सशक्त भारत जर बनवायचा असेल तर प्रत्येकाने तेल कमी खायला हवे, या आव्हानासोबत चालण्याचे मी आवाहन करतो असेही मोदी म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+