मोठी बातमी! ज्योतिर्लिंग दर्शनासाठी रेल्वेची विशेष भारत गौरव ट्रेन: IRCTCचे बुकिंग सुरू वाचा डिटेल्स
Indian Railways announces jyotirlinga yatra package : हिंदू धर्मात भगवान शिवाचे सर्वात मोठे स्थान आहे. भगवान शंकराची पुजेला आणि त्यांच्या दर्शनाला खूप महत्व दिले जाते. असे भगवान शिवाचे देशात १२ ज्योतिर्लिंग मंदिरं आहेत, आणि ते पुर्णपणे पाहावे भेट द्यावी आणि भगवान शिवाची आराधना करावी असे सर्वच शिवभक्तांना वाटते. हा मुद्दा भारतीय रेल्वेने लक्षात घेऊन खास भेट दिली आहे.

जर तुम्हीही देशातील पवित्र ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याचा विचार करत आहात? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने सात ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी 'भारत गौरव टूरिस्ट ट्रेन' सुरू केली आहे. ही १२ दिवसांची विशेष यात्रा असून, यात इतर प्रमुख धार्मिक स्थळांचाही समावेश आहे.आईआरसीटीसी भारत गौरव टूरिस्ट ट्रेन द्वारा पवित्र 07 ज्योतिर्लिंगों के दर्शन हेतु विशेष यात्रा सेवा का संचालन किया जा रहा है। यह यात्रा 18 नवम्बर 2025 को योग नगरी ऋषिकेश से प्रारंभ होगी।— IRCTC Bharat Gaurav Tourist Train (@IR_BharatGaurav) August 31, 2025
यात्रेत कोणत्या ज्योतिर्लिंगांचा समावेश आहे?
या विशेष टूर पॅकेजमध्ये भगवान शंकरांना समर्पित असलेल्या भारतातील सात प्रमुख ज्योतिर्लिंगांचा समावेश आहे.
- ओंकारेश्वर
- महाकालेश्वर
- नागेश्वर
- सोमनाथ
- त्र्यंबकेश्वर
- भीमाशंकर
- घृष्णेश्वर
याशिवाय, द्वारकाधीश मंदिर आणि बेट द्वारका यांसारख्या अन्य महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांनाही या यात्रेत भेट देता येईल.
प्रवासाची तारीख आणि कालावधी
सुरुवात: १८ नोव्हेंबर २०२५ रोजी योग नगरी ऋषिकेश रेल्वे स्टेशनवरून या यात्रेला सुरुवात होईल.
कालावधी: ११ रात्री / १२ दिवस.
प्रवासाचा मार्ग: योग नगरी ऋषिकेश → ओंकारेश्वर → महाकालेश्वर → द्वारकाधीश मंदिर आणि नागेश्वर → सोमनाथ → त्र्यंबकेश्वर → भीमाशंकर → घृष्णेश्वर → योग नगरी ऋषिकेश.
एकूण सीट्स: ७६७
प्रवासाचे भाडे (प्रति व्यक्ती):
- कम्फर्ट (2AC): ₹५४,३९०
- स्टँडर्ड (3AC): ₹४०,८९०
- इकोनॉमी (स्लीपर): ₹२४,१००
पॅकेजमध्ये काय समाविष्ट आहे?
- ट्रेनचा पुर्ण प्रवास या पॅकेजमध्ये समाविष्ट आहे.
- बजेट हॉटेल्समध्ये रात्रीचा मुक्कामही समाविष्ट आहे.
- निवडलेल्या श्रेणीनुसार (इकोनॉमी, स्टँडर्ड किंवा कम्फर्ट) बजेट हॉटेल्समध्ये 'वॉश अँड चेंज' सुविधा.
- सर्व जेवण (सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण - केवळ शाकाहारी).
- प्रवाशांसाठी प्रवास विमा.
- व्यावसायिक टूर एस्कॉर्ट्सची सेवा.
- IRCTC टूर मॅनेजर संपूर्ण प्रवासात सोबत असतील.
- सर्व लागू कर.
पॅकेजमध्ये काय समाविष्ट नाही?
- स्मारक आणि मंदिरांमध्ये प्रवेश शुल्क, नौकाविहार इत्यादी.
- स्थलांतर, प्रवेश शुल्क आणि स्थानिक मार्गदर्शकाचे शुल्क.
- ड्रायव्हर्स, वेटर, मार्गदर्शक, प्रतिनिधी यांना टीप, इंधन अधिभार इत्यादी.
- कपडे धुणे, वाईन, मिनरल वॉटर, भोजन आणि पेये यांसारखे वैयक्तिक खर्च.
- समाविष्ट नसलेल्या इतर कोणत्याही सेवा.
- ही विशेष यात्रा भगवान शंकराच्या भक्तांसाठी एक अविस्मरणीय अनुभव देणारी ठरेल.
हेही वाचा : रेल्वे तिकीट बुकींग ते पॅन 1 जुलैपासून हे 5 नियम बदलणार! नोकरदार अन् करदात्यांसाठी हे माहिती असावेच












Click it and Unblock the Notifications