Independence day 2025 Wishes in Marathi : स्वातंत्र्य दिनानिमित्त टाॅप 10 मराठी शुभेच्छा संदेश
Independence day 2025 Wishes in Marathi : 14 ऑगस्ट 1947 ची ती वेळ 11.59 मिनिटांपर्यंत पारतंत्र्यात असलेल्या भारत, एक मिनिटांनी बरोब्बर घडीचा काटा सरकतो आणि 15 ऑगस्टचा दिवस सुरु होतो. ही मध्यरात्र भारतासाठी संघर्षानंतरची शांत, नीरव आणि मुक्त अशी रात्र बनते अन् काही तासांतच तमाम भारतीयांच्या जीवनातील स्वातंत्र्याची पहाट होते.
होय 15 ऑगस्ट असा दिवस जो जन्मापासून मृत्यूपर्यंत कुणीच कधी विसरु शकणार नाही. स्वातंत्र्य चळवळ आणि ते बलिदान, संघर्ष आणि लढा, सत्याग्रह हे सर्व आणि सर्व कुणीही विसरणार नाही. महापुरुष तर आपल्या विचारात आणि रक्तात भिनले आहेत. अशा उज्ज्वल भारताच्या स्वातंत्र्याचे मोल समस्त देशवासीयांना आहे, आणि त्यामुळेच आपण 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करतो. या राष्ट्रीय उत्सवाच्या दिवसानिमित्त समस्त तुम्ही तुमच्या जवळच्या आप्तेष्ठ, मित्र आणि नातेवाईकांना शुभेच्छा देऊन राष्ट्रभक्ती जागृत करु शकता, त्यासाठी खास टाॅप 10 मराठी शुभेच्छा संदेत आम्ही येथे देत आहोत.

Photo - AI
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश (Independence day 2025 Wishes in Marathi)
1. भारताची संस्कृती, विविध धर्म आणि निसर्ग संपदा जगातील सर्वात लोकशाही असलेल्या देशाला माझे नमन, माझ्या समस्त भारतीय बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!!
2. चंद्राच्या दक्षिण भागावर पोहचण्याची किमया आपल्या शास्त्रज्ञांनी केली. साऱ्या भारतीयांची मान उंचावली, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
3. भारत जगात चौथी आर्थिक महासत्ता बनला, अभिमान आहे मला माझ्या देशाचा, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
4. भारत नेहमीच पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदाना अन् युद्धाच्या मैदानाताही लोळवतो. माझा देश महान, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
5. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे जगात आपली छाप सोडली. सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
6. ऑपरेशन सिंदूर फक्त एक मोहिम नाही तर तो रक्त सांडलेल्या जवानांचे आणि निष्पाप नागरिकांच्या मृत्यूचा बदला आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
7. माझा देश माझा अभिमान, राष्ट्रभक्ती सर्वांच्या अंगात संचारत राहो आणि हा देश उत्तरोत्तर प्रगती करत राहो. जय भारता.. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
8. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो.. तो आम्हाला प्राणाहून प्रिय आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
9. विजयी विश्वतिरंगा प्यारा झंडा उँचा रहे हमारा, माझ्या भारत मातेच्या चरणी नमन, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
10. हे स्वातंत्र्य लाखो,शहीदांच्या प्राणार्पणाने आणि संघर्ष, बलिदानाने मिळालेले आहे. महात्मा गांधी ते भगतसिंग सर्व त्या महापुरुषांना नमन. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!












Click it and Unblock the Notifications