हेमंत सोरेन यांचा आज शपथविधी; वाचा कशी आहे रांचीतील तयारी

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएचे पानिपत करत इंडी आघाडीने दमदार विजय मिळवला होता. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या पक्षाला बहुमत मिळाले. त्यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा आज होत असून शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तब्बल 4 हजार जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. विविध राज्यातील मुख्यमंत्र्‍यांसह बडे नेते या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

Hemant Soren

मोर्हाबादी मैदानावर होणार सोहळा

हेमंत सोरेन यांच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळा मोर्हाबादी मैदानावर होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. शपथविधी सोहळ्यासाठी 35 हजारांहून अधिक समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील अनेक हॉटेल्स आणि लॉजचे बुकिंग सुरू झाले आहे. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक बडे राजकारणीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळेच रांची पोलीस आणि जिल्हा प्रशासन शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी करत आहेत.

सुरक्षेसाठी राहणार 4000 जवान

हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी कालपासूनच त्यांचे समर्थक राजधानीत पोहचू लागले आहेत. या शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी 4000 जवान तैनात राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रांची विमानतळ, हॉटेल, सर्किट हाऊस, मोरहाबादी मैदान आणि मार्गावर चार हजारांहून अधिक सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. विशेष सैनिकांना वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात येणार आहे.

मैदानावर बैठक व्यवस्था झाली पूर्ण

हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मोर्हाबडी मैदानात एक मोठा स्टेज बांधण्यात आला आहे. या स्टेजवर 50 ते 60 लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. मैदानाची पाच थरांमध्ये विभागणी करण्यात आली असून, त्यामध्ये बसण्याची व्यवस्था असेल. ज्यांना बसायला जागा नाही त्यांना समोरून उभे राहून शपथविधी पाहता यावा यासाठी मंचासमोरील जागा पूर्णपणे मोकळी ठेवण्यात आली आहे. हे मैदान पूर्ण भरण्याची शक्यता सोरेन यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+