Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

झारखंडचे 14वे CM हेमंत सोरेन; एकेकाळी राजकारणापासून अलिप्त राहणारे सर्वशक्तीमान नेते कसे बनले?

How Hemant Soren became a powerful leader in Jharkhand politics : झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) नेते हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन इतिहास रचला आहे. हेमंत सोरेन हे झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री बनले आहेत. हेमंत सोरेन हे झारखंडच्या राजकारणाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली नेते ठरले आहेत. हेमंत सोरेन यांचे एकमेव सरकार झारखंडमध्ये दोनदा सत्तेवर आले आहे. पण एक काळ असा होता की हेमंत सोरेन यांनी राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवले होते. पण आता तेच हेमंत सोरेन हे झारखंडच्या राजकारणातील बाप कसे बनले आहेत, सर्वात शक्तीशाली नेते होण्यामागील त्यांची कहाणी वाचा सविस्तर....!

मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत सोरेन यांना शिक्षणासाठी परदेशात जायचे होते. अभियांत्रिकी पदवी आणि उच्च शिक्षण घेण्याचे हेमंत सोरेन यांचे स्वप्न होते. हेमंत सोरेन यांनी पाटणा हायस्कूलमधून इंटरमिजिएट पूर्ण केल्यानंतर, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा, रांची येथेही प्रवेश घेतला होता. येथून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यादरम्यान त्यांच्या आयुष्यात असे काही घडले ज्यामुळे त्यांना त्यांचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि त्यांना राजकारणात पुन्हा सक्रिय व्हावे लागले.

Jharkhand Assembly Election 2024

पहिल्या निवडणुकीत पराभव अन् सोडला होता नाद

हेमंत सोरेन यांचा जन्म 10 ऑगस्ट 1975 रोजी झाला. त्याच्या जन्मानंतर अवघ्या एका महिन्यात त्याचे वडील शिबू सोरेन यांनी सरेंडर केले. आदिवासींच्या आंदोलनाबाबत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले होते. झारखंडच्या निर्मितीनंतर मार्च 2005 मध्ये पहिला निवडणूक निकाल लागला. या निवडणुकीत हेमंत सोरेनही दुमका मतदारसंघातून निवडणूक लढवत होते, मात्र त्यांचा अपक्ष उमेदवार स्टीफन मरांडी यांच्याकडून पराभव झाला. यानंतर हेमंत सोरेन यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता. असे म्हटले जाते की ते फोटोग्राफी आणि स्केचिंगमध्ये परत जाणार होते. त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा, रांची येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी सरकारी कोट्यातून प्रवेश घेतला होता.

दुर्गा सोरेन यांच्या निधनानंतर हेमंत सोरेन सक्रिय

हेमंत सोरेन पूर्णपणे अभ्यासात गुंतले होते. परदेशात जाऊन पुढील शिक्षण घ्यायचे होते. दरम्यान, 22 मे 2009 रोजी हेमंत सोरेन यांचा मोठा भाऊ आणि शिबू सोरेन यांचा मोठा मुलगा दुर्गा सोरेन यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याने अचानक निधन झाले. त्या काळात दुर्गा सोरेन झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्याध्यक्ष होते. संपूर्ण राज्याची सत्ता त्यांच्या हाती होती. भावाच्या निधनानंतर अचानक पक्षाची संपूर्ण जबाबदारी हेमंत सोरेन यांच्या खांद्यावर आली. हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन हे त्यांच्या वाढत्या वयामुळे आणि खराब प्रकृतीमुळे केंद्रीय राजकारणातच सक्रिय राहू शकले. अशा परिस्थितीत हेमंत सोरेन यांना आपले अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून सक्रिय राजकारणात यावे लागले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याचाच परिणाम आहे की आज हेमंत सोरेन झारखंडचे सर्वात शक्तिशाली नेते बनले आहेत.

वडील शिबू सोरेन यांच्यासोबत 2009 मध्ये निवडणूक लढवली

हेमंत सोरेन यांनी 2009 ची झारखंड विधानसभा निवडणूक त्यांच्या वडिलांसोबत लढवली होती. यावेळी त्यांनी दुमका मतदारसंघातून स्टीफन मरांडी यांचा पराभव करून विधानसभेत पोहोचले. या निवडणुकीनंतर, JMM ने सरकार स्थापन केले आणि शिबू सोरेन यांनी 30 डिसेंबर 2009 रोजी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, हे सरकार फार काळ टिकले नाही आणि 2010 मध्ये पडले.

खरे तर एप्रिल 2010 मध्ये भाजपने मनमोहन सिंग सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. जिथे JMM ने UPA ला पाठिंबा दिला होता. झारखंडमध्ये याकडे विश्वासघात म्हणून पाहिले जात होते. त्यावेळी हेमंत सोरेन यांनी वडिलांच्या चुकीबद्दल भाजपची माफीही मागितली होती पण भाजपला ते मान्य नव्हते आणि सरकार पडले. यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मात्र त्यानंतर भाजपने झामुमोसोबत सरकार स्थापन केले. त्यादरम्यान, 11 सप्टेंबर 2010 रोजी अर्जुन मुंडा मुख्यमंत्री आणि हेमंत सोरेन उपमुख्यमंत्री झाले. मात्र, हे सरकारही फार काळ टिकले नाही आणि युतीमधील अधिवास धोरणातील मतभेदांमुळे 8 जानेवारी 2013 रोजी सरकार पडले. यानंतर JMM ने AJSU सोबत सरकार स्थापन केले.

हेमंत सोरेन 2013 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले

हेमंत सोरेन 13 जुलै 2013 रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. हे सरकार दीड वर्ष टिकले. त्यानंतर 23 डिसेंबर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जेएमएमचा पराभव झाला, त्यानंतर हेमंत सोरेन यांना राजीनामा द्यावा लागला. हेमंत सोरेन पाच वर्षे सत्तेपासून दूर राहिले पण त्यांनी आपली राजकीय खेळी तयार केली, ज्याचा फायदा त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून हेमंत सोरेन 29 डिसेंबर 2019 रोजी झारखंडचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले.

जेव्हा हेमंत सोरेन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात जावे लागले होते

हेमंत सोरेन यांना ईडीने 31 जानेवारी 2024 रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. अटक होण्यापूर्वी हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन यांनी 4 जुलै 2024 रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर 28 नोव्हेंबर 2024 रोजी हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. होते. हेमंत सोरेन यांच्या आधी त्यांचे वडील शिबू सोरेन आणि भाजपचे अर्जुन मुंडा यांनी प्रत्येकी तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+