Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Haritalika Vrat 2025 हरितालिकेची काय आहे पौराणिक कथा? शिव पार्वतीच्या प्रेमाबद्दल जाणून घ्या

Haritalika Vrat 2025 Story : हिंदू धर्मातील प्रत्येक व्रत आणि सण काहीतरी विशेष शिकवण देतात. असाच एक महत्त्वाचा सण म्हणजे हरितालिका...आज 26 ऑगस्ट 2025 रोजी हरितालिका व्रत उत्सव आहे. भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीयेला साजरा होणारा हा उत्सव कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शिव-पार्वतीच्या अतूट नात्याची ही कथा हरितालिकेच्या निमित्ताने आपण आज जाणून घेऊया.

पौराणिक आख्यायिकेनुसार, 'हरिता' म्हणजे जिला नेले ती आणि 'लिका' म्हणजे सखी. पार्वतीला शंकराची पत्नी होण्यासाठी तिच्या सखीने घरातून पळवून नेले, म्हणूनच तिला 'हरितालिका' असे म्हणतात. शिव-पार्वतीच्या अतुट नात्याची आणि सखीच्या मदतीची ही कहाणी आपल्याला 'भविष्य पुराणा'तील हरगौरीसंवादामध्ये आढळते.

Haritalika Vrat 2025 Shivparvati Mythical Story Katha

हरितालिकेची कथा आणि त्यामागील भाव (Haritalika Vrat 2025 Story)

हरितालिकेची कथाही फार रोचक आहे, धार्मिक धारणा आणि पौराणिक आख्यायिकेनुसार, पर्वतराजाची कन्या पार्वती उपवर झाली, त्यानंतर नारदमुनींच्या सांगण्यावरून तिच्या वडिलांनी तिचा विवाह भगवान विष्णूंसोबत करण्याचा निर्णय घेतला, पण पार्वतीच्या मनात भगवान शंकराचेच स्थान होते. त्यामुळे तिने आपल्या सखीच्या मदतीने पित्याला निरोप पाठवला की, जर तुम्ही माझा विष्णूंशी केला तर मी प्राणत्याग करेन. एवढ्यावरच माता पार्वती थांबली नाही, तर आपल्या मैत्रिणीच्या मदतीने ती घरातून निघून अरण्यात गेली आणिभगवान शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी वनात तपश्चर्या करू लागली.

तपर्श्चयेचा दिवस भाद्रपद महिन्यातील तृतीया आणि हस्त नक्षत्र होता. माता पार्वतीने वाळूचे शिवलिंग तयार केले, दिवसभर कडकडीत उपवास केला आणि रात्रभर जागरण करून शिवाची आराधना केली. तिच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारले. म्हणूनच 'शिवा भूत्वा शिवां यजेत्' या भावनेने हरितालिकेची पूजा केली जाते, म्हणजेच पार्वतीच्या भूमिकेत शिरून शिवाची आराधना करणे.

पूजेचा विधी आणि व्रताचा उद्देश

हरितालिकेच्या पूजेमध्ये वाळूचे शिवलिंग, पार्वती आणि तिच्या सखीची मूर्ती आणून त्यांची स्थापना केली जाते.
या पूजेमध्ये संकल्प, षोडशोपचार पूजा, सौभाग्य लेणे अर्पण करणे, नैवेद्य दाखवणे, आरती आणि कथावाचनाचा समावेश असतो. महिला रात्रभर जागरण करतात, विविध खेळ खेळतात आणि देवीची आराधना करतात.
दुसऱ्या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून त्याची चव घेत महिला आपला उपवास सोडतात.

या व्रताचा मुळ अर्थ काय?

या व्रतामागील खरा आशय शिव-पार्वती किंवा उमा-महेश्वर यांना जगाचे माता-पिता मानणे हा आहे. स्त्री तत्त्व आणि पुरुष तत्त्व यांच्या मिलनातूनच विश्वाची निर्मिती झाली आहे. या आदिशक्तीच्या पूजनाने ती शक्ती आपल्यामध्ये प्रकट व्हावी अशी प्रार्थना या व्रताद्वारे केली जाते.

भारताच्या विविध प्रांतांमध्ये हरितालिका

  • हरितालिका हे व्रत संपूर्ण भारतात मोठ्या श्रद्धेने केले जाते, पण प्रत्येक प्रांतात त्याची पद्धत वेगळी आहे.
  • दक्षिण भारतात अनेक कुमारिका चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत करतात.
  • महाराष्ट्रात विवाहित स्त्रिया तसेच विधवा स्त्रियाही हे व्रत करतात. सिंधुदुर्ग किनारी आणि गोवा राज्यातही हे व्रत केले जाते.
  • उत्तर भारतात (बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान) महिला मोठ्या उत्साहात हे व्रत साजरे करतात.
  • काशी आणि तमिळनाडूमध्ये माघ महिन्यापासून तीन दिवस गौरी उत्सव साजरा केला जातो, जिथे कुमारिका आणि महिला यात सहभाग घेतात.

हरतालिका व्रताची तारीख

पंचांगानुसार, भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 1:54 वाजता सुरू होत आहे आणि 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1:54 वाजता संपेल. उदयतिथी (सूर्योदयाच्या वेळी असलेली तिथी) वैध मानली जात असल्यामुळे, हरतालिका तीज 26 ऑगस्ट, मंगळवार रोजी साजरी केली जाईल. म्हणजेच, उपवास 26 ऑगस्ट रोजी ठेवला जाईल.

हरतालिका व्रत पूजा शुभ मुहूर्त 2025

सकाळचा शुभ मुहूर्त: 26 ऑगस्ट 2025, सकाळी 5:56 ते सकाळी 8:31 पर्यंत

अभिजीत मुहूर्त: सकाळी 11:57 ते दुपारी 12:48 पर्यंत

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+