Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये मानसादेवी मंदिरात चेंगराचेंगरी, 6 भाविकांचा मृत्यू!

Haridwar Mansa Devi Temple Stampede 6 devotees die : उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये आज सकाळी मानसादेवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली असून या गंभीर दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, अलोट गर्दीमुळे ही दुर्घटना घडली. गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी मंदिरा परिसरात खूप मोठी गर्दी झाली होती, घटना नेमकी कशी झाली याचा तपास करत आहोत असे म्हटले आहे.

Haridwar Mansa Devi Temple Stampede

हरिद्वारमधील चेंगराचेंगरीचे एनआयनेही वृत्त दिले आहे. वृत्तानुसार, मानसा देवी मंदिरात प्रचंड गर्दी जमल्यानंतर ही घटना घडली. दरम्यान चेंगराचेंगरीतील मृतात ६ जण कोण याची माहिती प्रशासन घेत आहे. "आपण मी घटनास्थळी जात आहोत. या घटनेचा सविस्तर अहवाल येण्याची वाट पाहत आहोत असेही गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी एएनआयलाला सांगितले.

काय म्हणाला प्रत्यक्षदर्शी?

उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मानसा देवी मंदिरात चेंगराचेंगरीतील जखमींपैकी एक नागरिक म्हणाला, "अचानक मानसा देवी मंदिरात मोठी गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान मी पडलो आणि माझा हात फ्रॅक्चर झाला..." दरम्यान, मानसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात येत आहे. चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले असून ठोस आकडा अद्याप प्राप्त झालेला नाही.

काय म्हणाले मुख्यमंत्री पुष्कर धामी?

"हरिद्वारमधील मानसा देवी मंदिरात जाताना चेंगराचेंगरी झाल्याची अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे. स्थानिक पोलिस आणि इतर बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत आणि मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. मी या संदर्भात स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात आहे आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. मी सर्व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी देवी मातेकडे प्रार्थना करतो."

15 जण जखमी अफवा पसरवल्यामुळे चेंगराचेंगरी

दैनिक भास्करनुसार, हरिद्वारच्या मानसा देवी मंदिरात जी चेंगराचेंगरी झाली, त्यामागे अफवा हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. एक हाय होल्टेज वीज तार पडल्याची अफवा पसरल्यानंतर ही चेंगराचेंगरी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या दुर्घटनेत जवळपास 15 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+