Valentine Day 2025 : या रोमँटिक शुभेच्छा संदेशने तुमच्या जोडीदाराचे जिंका मन, वाचताच इम्प्रेस होईल
Happy Valentine's Day Wishes for Girlfriend: व्हॅलेंटाईन डे हा जगभरात प्रेमासाठी सर्वात खास दिवस मानला जातो. वर्षभरातील सर्वात रोमँटिक दिवस आहे. व्हॅलेंटाईन वीकची प्रेमी वर्षभर आतुरतेने वाट पाहतात, त्यासाठी आता काही दिवसचं शिल्लक आहेत. 14 फेब्रुवारी हा प्रेम व्यक्त करण्याचा एक खास दिवस आहे.
या दिवशी प्रेमी त्यांच्या क्रश, मित्र किंवा जोडीदारासमोर त्यांच्या भावना व्यक्त करतात. हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी प्रेमीयुगुल अनेक तयारी करतात. जर तुम्हालाही तुमचे प्रेम कोणावर व्यक्त करायचे असेल तर यापेक्षा चांगला दिवस दुसरा नाही. याशिवाय, जर तुम्हाला तुमच्या प्रेयसीला तुमचे प्रेम व्यक्त करून खास इंम्प्रेस करायचे असेल, तर रोमँटिक मेसेज, सुंदर किंवा हृदयस्पर्शी मेसेज पाठवून हा दिवस संस्मरणीय बनवा.

प्रेम व्यक्त करायला एक दिवस पुरेसा नाही
प्रेमाचा हा बहर असाच युगान् युगे असू दे
कारण प्रेम ही भावना काही तासांची नाही
तर ही जन्मोजन्मीची राहू दे.... !
तुझ्या प्रेमाचा रंग तो
अजूनही बहरत आहे
शेवटच्या क्षणा पर्यंत
मी फक्त आणि फक्त तुझाच आहे
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!
तुला सात जन्माचे वचन नाही देत बसणार
पण ह्या जन्मात मरेपर्यंत साथ नक्कीच देणार..!
डोळ्यातल्या स्वप्नांना कधी प्रत्यक्षात आण
किती प्रेम करतो मी तुझ्यावर हे न सांगताच जाण
व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा... !
तुझे माझे नाते असे असावे
जे शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावे
कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी
मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावे
व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा... !
आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तू
माझ्या डोळ्यात नेहमी राहणार
स्वप्न आहेस तू
हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते मागणं आहेस तू... !
आजचा दिवस आहे खास
जन्मभर मिळो मला तुझा सहवास
आजचा दिवस आनंदाने भरलेला जावो
आणि आयुष्यही तुझ्या सान्निध्यात राहो.
तुझ्या हसण्याइतका आजचा सुंदर दिवस
संपूर्ण वर्षभर वाट पाहत होतो या दिवसाची
कारण आजचाच तो दिवस आहे
जेव्हा मला मागायचा आहे
आयुष्यभरासाठी तुझी साथ!
"प्रत्येक क्षणाने म्हटलंय
एका क्षणाला क्षणभरासाठी माझ्या समोर ये
पळभराची ती साथ अशी काही असो की
रोमारोमात तूच बहरून येऊ दे..!
हॅपी व्हॅलेंटाइन डे !
प्रेम म्हणजे गवताचं
एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं
खास नातं असतं
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे !












Click it and Unblock the Notifications