Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Happy Promise Day 2026 Wishes प्रॉमिस डे साठी पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसीसाठी खास वचनं, वाचा शेअर करा

Happy Promise Day 2026 Wishes in Marathi : व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि उद्या, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी 'प्रॉमिस डे' (Promise Day) साजरा केला जाणार आहे.नाती विश्वासावर टिकतात आणि विश्वास आश्वासनांवर. प्रॉमिस डे हा केवळ वचन देण्याचा दिवस नाही, तर ते वचन निभावण्याची जिद्द दाखवण्याचा दिवस आहे.

आपल्या जोडीदाराला दिलेली छोटी छोटी आश्वासने नाते अधिक घट्ट करतात. या खास निमित्ताने तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवण्यासाठी येथे काही खास शुभेच्छा संदेश दिले आहेत. जी तुम्ही त्यांना शेअर करुन किंवा प्रत्यक्ष वचन देऊन नातं दृढ करु शकता.

Happy Promise Day 2026 Wishes in Marathi

१. पती-पत्नीसाठी खास संदेश (For Husband & Wife)

  • "साथ देईन मी तुला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत, आनंदी ठेवेन तुला प्रत्येक क्षणापर्यंत. प्रॉमिस डेच्या मनापासून शुभेच्छा!"
  • "हातात हात घेऊन तू फक्त सोबत चालण्याचे वचन दे, संकटांना कसं हरवायचं हे मी बघून घेईन. हॅप्पी प्रॉमिस डे!"
  • "कधी रुसलीस तरी मनवेन तुला, पण कधीच स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही, हे माझं तुला वचन आहे."

२. प्रियकर-प्रेयसीसाठी रोमँटिक शुभेच्छा (For Boyfriend & Girlfriend)

  • "शब्दांनी नाही तर डोळ्यांनी तुला वचन देतो, माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची व्यक्ती तूच असशील. Happy Promise Day!"
  • "तुझ्या चेहऱ्यावरील हास्य कधीच कमी होऊ देणार नाही, आणि तुला कधीच एकटं सोडणार नाही, हे आज माझं तुला प्रॉमिस आहे."
  • "आपल्या प्रेमाचा प्रवास असाच बहरत राहो, कोणत्याही परिस्थितीत तू फक्त माझी/माझाच राहा. हीच माझी शपथ!"

तुमच्या व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम किंवा फेसबुक स्टेटससाठी 'प्रॉमिस डे' विशेष १० खास कोट्स

  • १. "शब्दांपेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवूया, आणि आयुष्यभर एकमेकांची साथ निभावण्याचे वचन देऊया. हॅप्पी प्रॉमिस डे!"
  • २. "तू फक्त साथ देण्याचे वचन दे, संकटांशी कसं लढायचं हे मी बघून घेईन. Happy Promise Day!"
  • ३. "वचन असं द्या जे तुम्ही पाळू शकाल, आणि प्रेम असं करा जे कोणीच तोडू शकणार नाही."
  • ४. "तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य कधीच कमी होऊ देणार नाही, हे माझं तुला आज आणि आयुष्यभरासाठी प्रॉमिस आहे."
  • ५. "कधीच रडवणार नाही तुला, आणि आयुष्याच्या प्रत्येक कठीण वळणावर खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहीन."
  • ६. "प्रेम म्हणजे केवळ 'आय लव्ह यू' म्हणणं नाही, तर शेवटपर्यंत साथ देण्याचं दिलेलं वचन निभावणं होय."
  • ७. "आपल्या नात्यात विश्वास असावा इतका की, प्रॉमिसची कधी गरजच पडू नये. तरीही आज वचन देतो की, मी फक्त तुझाच/तुझीच राहीन!"
  • ८. "हातात हात घेऊन चालताना, तुझं मन कधीच दुखावणार नाही हे माझं तुला आजचं खास वचन."
  • ९. "जगासाठी तू एक व्यक्ती असशील, पण माझ्यासाठी तूच माझं संपूर्ण जग आहेस. तुला कधीच विसरणार नाही हे माझं प्रॉमिस!"
  • १०. "वचन हे केवळ शब्दांचं नसतं, ते हृदयापासून हृदयापर्यंत दिलेला एक विश्वास असतो. प्रॉमिस डे च्या शुभेच्छा!"
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+