Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Guru Pushya Yoga 2025: आज गुरु पुष्य योग, महत्व, पुजा-विधी वेळ काय? या दिवशी ही कामे करा उजळेल भाग्य

Guru Pushya Yoga 2025 importance muhurta puja vidhi : गुरु आणि शिष्य यांच्यातील नात्याला पुरातन काळापासून महत्व आहे. गुरु ज्ञानदानाचे कार्य करतो आणि शिष्याला गुरुएवढे ज्ञान देतो, बहुदा त्यापेक्षाही जास्त ज्ञानी करतो. निस्वार्थ असे हे नाते असते. याचे काही योगही असतात, ज्यात गुरु-पुष्यामृत हा महत्वाचा योग आहे. आज या वर्षातील दुसरा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली गुरु पुष्य योग तयार होत आहे.

Guru Pushya Yoga 2025

आज कधी आहे हा योग?

गुरु पुष्य योग आज सकाळी 6:09 पासून रात्री 12:08 पर्यंत एकूण 17 तास 59 मिनिटे राहील. हा महामुहूर्त सर्व कार्यांसाठी शुभ मानला जातो आणि प्रत्येक व्यक्तीने याचा लाभ घेतला पाहिजे, असे सांगितले जाते.

गुरु पुष्य योगाचे महत्त्व काय आहे?

पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा मानले जाते. त्याचे देवता गुरु आणि स्वामी शनी आहेत. त्यामुळे हे नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते. या नक्षत्रात केलेली कोणतीही कामे यशस्वी होतात. करिअर, धन, विवाह, प्रेम, शिक्षण, दान-धर्म यांसारख्या कामांसाठी गुरु पुष्य योग अत्यंत श्रेष्ठ मानला जातो.

गुरु पुष्य योग आज, काय करावे?

सोने-चांदी : गुरु पुष्य योगात सोन्याचे दागिने किंवा सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही सोने, चांदी, पितळ किंवा कांस्य वस्तूंची खरेदी करू शकता.

नवीन कामाची सुरुवात : कोणत्याही नवीन कामाची किंवा व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस खूप चांगला आहे.

धनाचे पूजन : घरात ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची हळदीने पूजा केल्यास आर्थिक लाभ होतो, अशा सर्व धारणा आहेत.

विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी काय करावे?

वनइंडिया हिंदीच्या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, ज्या तरुण-तरुणींच्या लग्नात अडथळे येत आहेत, त्यांनी गुरु पुष्य योगाच्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद आणि नवग्रह शांती औषधी घालून स्नान करावे. त्यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे घालून कपाळावर केशराचा टिळा लावावा. श्रीकृष्णाची पूजा करून त्यांना पिवळी फुले अर्पण करा. केळीच्या झाडाला हळद मिश्रित पाणी अर्पण करा आणि हळदीनेच त्याची पूजा करा. यामुळे विवाहातील सर्व अडथळे दूर होतात अशी धारणा आहे.

धनप्राप्तीसाठी काय..

  • गुरु पुष्य योग हा धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम दिवस आहे.
  • एका पिवळ्या कपड्यावर केशराच्या शाईने 'श्रीं श्रीं श्रीं' 27 वेळा लिहा.
  • त्याची पूजा करा आणि श्रीसूक्तचे 21 वेळा पठण करा.
  • त्यानंतर त्या कपड्यात पाच पिवळ्या कवड्या आणि पाच गोमती चक्रे बांधून आपल्या तिजोरीत ठेवा. यामुळे धनाची आवक वाढेल अशी धारणा आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+