Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'लकी कार'वर अंत्यसंस्कार, कार्यक्रमावर 4 लाखाचा खर्च, शेवटच्या प्रवासाला 1500 लोकांची हजेरी

Lucky Car News : आपण आपली गाडी बिघडली किंवा खराब झाली तर ती दुरुस्त करून घेतो, जुनी झाली तर ती भंगारात विकतो. पण गुजरातमधील एका कुटुंबाने आपल्या कारसोबत असे काही केले की, ज्याबद्दल ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. प्रत्यक्षात गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील लाठी तालुक्यातील पदरशिंगा गावात संजय पोलारा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची लकी गाडी जुनी असल्याने स्क्रॅप करण्याऐवजी तिची शेवटची मिरवणूक काढत विधीवत अंत्यसंस्कार केले आहेत.

अंत्यसंस्कारासाठी कुटुंबातील सदस्य, पंडित आणि आध्यात्मिक नेत्यांसह सुमारे 1,500 लोक उपस्थित होते. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये आपल्या लकी कारला खोल खड्यात गाडलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

lucky car

लकी कारवर अंत्यसंस्कार

संजय पोलारा यांच्या कूटूंबाचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. 12 वर्षांपूर्वी त्यांनी वॅगन आर नावाची कार खरेदी केली होती. कार खरेदी केल्यानंतर या कुटुंबाची बरीच प्रगती झाली. ही कार या कुटुंबासाठी खूप लकी ठरली. या कारमुळेच आपली खरी प्रगती झाली आहे, त्यामुळे या कुटूंबाने या कारला लकी मानलं. या कारशी पोलारा कुटुंबाचे भावनिक बंध निर्माण झाले होते. आता ही गाडी विकण्याऐवजी किंवा भंगारवाल्याला देण्याऐवजी त्यांनी पूर्ण विधी करून तिच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत.

अंत्यसंस्कारासाठी गाडी फुलांनी आणि हारांनी सजवली गेली. पोलारा यांच्या घरापासून त्यांच्या शेतापर्यंत मोठ्या थाटामाटात कारची मिरवणूक काढण्यात आली. कार कापडाने झाकल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी पूजा केली, मंत्रोच्चार केला आणि कारवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. यानंतर शेतात खड्डा खणण्यात आला, गाडी मातीने झाकून पूर्ण विधी करून पुरण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमावर कुटुंबाकडून 4 लाख रुपये खर्च करण्यात आला असून 15 लोकांना जेवणही देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+