Vijay rupani : गुजरातचे माजी CM विजय रुपानी यांचे विमान अपघातात निधन, 100हून अधिक मृतदेह काढले...
Vijay rupani News : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान कोसळले आहे. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते विजय रुपानी यांचा देखील मृत्यू झाला आहे.
भाजपचे राज्यसभा खासदार परिमल नाथवाणी यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, अधिकृतरित्या अजून घोषणा झालेली नाही. परंतु, भाजप खासदारांनी यासंदर्भात माहिती दिल्याने त्याला पुष्टी मिळाली आहे.

विमानात एकूण किती प्रवाशी होते?
मिळालेल्या माहितीनुसार, विमानात 242 प्रवासी होते. त्यापैकी 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. आतापर्यंत अपघातस्थळावरून 100 हून अधिक मृतदेह काढण्यात आले आहेत.

ज्या इमारतीवर विमान आदळलं, ते डॉक्टरांचे हॉस्टेल
दुसरी बाब म्हणजे, ज्या इमारतीवर विमान आदळले होते. त्या इमारतीत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर होते. मिळालेल्या माहितीनुसार, 15 डॉक्टर जखमी झाले आहेत. एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय-१७१ दुपारी १:३८ वाजता उड्डाण केले. दुपारी 1:40 वाजता ते कोसळले.
हे ही वाचा : पत्नीला आणायला निघाले, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळचं होतं; विजय रुपाणी यांचं दु्र्दैवी निधन
मदतकार्य जोरात सुरू
माहितीनुसार, विमान विमानतळाच्या भिंतीजवळ आणि एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळ कोसळले. विमान पडताच संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होेते. त्यानंतर मदतकार्य सुरू करण्यात आले.
हे ही वाचा : Ahmedabad plane Crash : अहमदाबादमध्ये विमान का कोसळलं, कसा घडला थरार, पाहा- Video
अपघात कसा झाला? काय चूक झाली?
दुपारी 1:38 वाजता विमानाने उड्डाण केले आणि दुपारी 1:40 वाजता अपघात झाला. विमान विमानतळाच्या भिंतीजवळ आणि कस्टम कार्गो कार्यालयाजवळील मेघानी नगरमध्ये पडले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, विमान 825 फूट उंचीवर पोहोचले होते, तेव्हा अचानक ते खाली पडले, ज्यामुळे मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण परिसरात काळा धूर पसरला.
लांब पल्ल्याच्या उड्डाणासाठी विमानात मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यात आले होते, ज्यामुळे आग अधिक भयानक बनली. कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर विमान उडवत होते. टेकऑफनंतर लगेचच वैमानिकाने मेडे कॉल केला होता, परंतु त्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. अन् अवघ्या काही सेकंदामघ्ये होत्याचे नव्हते झाले.












Click it and Unblock the Notifications