Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ahmedabad plane Crash : अहमदाबादमध्ये विमान का कोसळलं, कसा घडला थरार, पाहा- Video

Ahmedabad Air India Plane Crash Update news in Marathi : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग ड्रीमलाइन-787 कोसळले. गुरुवारी (12 जून) दुपारी ही घटना घडली असून ज्याचे भयानक फोटो व व्हिडिओ समोर येत आहेत.

अहमदाबादच्या मेघनीनगर भागात आगीच्या प्रचंड ज्वाला उडाल्या. त्याच वेळी दूरवरून काळ्या धुराचे लोट दिसू लागले. या विमानात 242 प्रवासी प्रवास करत होते. याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी देखील सहभागी आहेत. तर या अपघातात सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. तर या घटनेनेचे व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. हा अपघात कसा घडला, विमान कसे कोसळले याची प्राथमिक माहिती आता समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया याविषयी सर्व काही.

कशामुळे झाला अपघात?

हे ड्रीमलाइनर बोईंग-787 लंडनला निघाले होते. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताना जवळच्या इमारतीला किंवा भिंतीला धडकल्याने विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Ahmedabad plane Crash

कसा घडला प्रकार, विमानाचे झाले तुकडे

प्राथमिक माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झाला. विमानतळाच्या सीमेजवळ हे विमान कोसळल्याचे मानले जात आहे. समोर आलेल्या सुरुवातीच्या छायाचित्रांमध्ये, विमानाचे तुकडे झाल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य अतिशय वेगात सुरू झालेले आहे.

किती वाजता झाले उड्डाण, पायलटला किती होता अनुभव?

या विमानाचे नेतृत्व कॅप्टन सुमित सभरवाल (8,200 तासांचा उड्डाणाचा अनुभव) आणि सह-वैमानिक क्लाईव्ह कुंदर (1100 तासांचा अनुभव) यांनी केले होते. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) नुसार, विमानाने धावपट्टी 23 वरून दुपारी 1.39 वाजता भारतीय वेळेनुसार (08:09 यूटीसी) उड्डाण केले.

उड्डाणानंतर, विमानाने एटीसीला मेडे कॉल केला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले, त्यानंतर घटनास्थळावरून काळा धूर आणि ढिगारा दिसला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील विमानात होते.

एअर इंडियाचे विमान कोसळले

चित्रात विमानाचा एक पंख तुटून पडला आहे असे दिसत आहे. अग्निशमन दलाचे जवान पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या आग काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा विमान विमानतळावरून उड्डाण घेत होते.

सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे, हा भीषण अपघात पाहून लोक घाबरलेले आहेत. इकडे तिकडे धावत आहेत. विमान पूर्णपणे खराब झाले आहे. विमानाचा बहुतांश भाग जळून खाक झाला आहे. ज्या इमारतीवरून विमान पडले त्या इमारतीचेही नुकसान झाले आहे.

सर्व डॉक्टरांच्या सुट्या रद्द

विमानतळाजवळ एक सिव्हिल हॉस्पिटल आहे, जिथे सर्व डॉक्टरांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादहून उड्डाण केलेले हे विमान लंडनला जात होते.

बोईंग 787-8 ड्रीमलायनर म्हणजे काय?

बोईंग 787-8 ड्रीमलायनर हे बोईंगने बनवलेले एक आधुनिक, मध्यम आकाराचे, जुळे इंजिन असलेले, रुंद-बॉडी जेट विमान आहे. ते लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी डिझाइन केलेले आहे. जुन्या बोईंग 767 ची जागा घेण्यासाठी सादर करण्यात आले आहे. हे इंधन-कार्यक्षम विमान आहे. याच कंपनीच्या विमानाचा आज गुजरातमध्ये अपघात झाला आहे.

2020 मध्येही झाला होता अपघात, 21 जणांचा गेला होता बळी!

7 ऑगस्ट 2020 रोजी केरळमधील कोझिकोड येथे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान धावपट्टीवरून घसरून कोसळले. यामध्ये 21 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 110 जण जखमी झाले. कोरोना काळात वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईहून भारतीयांना आणले जात होते. यावेळी हा भीषण अपघात झाला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+