Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विवाहबाह्य संबंधात हे शहर आघाडीवर! यादी वाचून व्हाल थक्क! अ‍ॅशले मॅडिसनच्या अहवालात धक्कादायक खुलासे

extramarital affairs : अलिकडे विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अनेक मिडिया रिपोर्ट आणि वृत्तांमधून याचे खुलासेही होत आहेत. केवळ विवाहबाह्यसंबंधावरच हे प्रकरणं बहुतांशवेळा थांबत नसून काही गु्न्हेगारी कृत्यही विवाहबाह्य संबंध असलेल्यांकडून होत आहेत. विवाहबाह्य संदर्भात, विवाहित लोकांसाठी असलेल्या अ‍ॅशले मॅडिसन (Ashley Madison) या डेटिंग प्लॅटफॉर्मने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात विवाहबाह्य संबंधांच्या बाबतीत टॉप शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

extramarital affairs Kanchipuram is top

हे शहर विवाहबाह्य संबंधात आघाडीवर

'अ‍ॅशले मॅडिसन'च्या अहवालानुसार, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तमिळनाडूमधील कांचीपुरम् हे शहर विवाहबाह्य संबंधांच्या बाबतीत आघाडीवर आहे. दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांना मागे टाकून कांचीपुरम या स्थानावर पोहचला आहे. हा डेट जून २०२५ मधील वेबसाइटवरील नवीन युजर्सच्या अॅक्टीव्हीटीवर आधारित आहे.

१७ व्या स्थानावरुन पहिल्या स्थानावर

कांचीपरम् हे शहर २०२४ मध्ये १७ व्या स्थानावर होते, या वर्षी २०२५ मध्ये हे शहर थेट पहिल्या स्थानावर पोहोचले आहे. टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये डेटिंग ॲप्सची वाढती लोकप्रियता हे यामागे एक मोठे कारण असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कोणते शहर कितव्या स्थानावर

मध्य दिल्ली दुसऱ्या स्थानावर : अ‍ॅशले मॅडिसनने जाहीर केलेल्या टॉप २० शहरांच्या यादीत मध्य दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे.

दिल्ली-एनसीआर : दिल्ली-एनसीआरमधील एकूण ९ जिल्हे टॉप २० शहरांच्या या यादीत समाविष्ट आहेत. यामध्ये मध्य दिल्ली, दक्षिण-पश्चिम दिल्ली, पूर्व दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली, उत्तर-पश्चिम दिल्ली, गुडगाव, गाझियाबाद आणि नोएडा यांचा समावेश आहे.

टाॅप २० मध्ये मुंबईचा एकही परिसर नाही

सर्वात मोठी आणि दिलासादायक बाब म्हणजे दिल्ली-एनसीआरमधील ९ जिल्हे टॉप २० मध्ये असताना, मुंबईचा एकही परिसर या यादीत नाही.

यादीत आणखी कोणती शहरं?

जयपूर, रायगड, कामरूप आणि चंदीगड सारख्या शहरांनी देखील या यादीत स्थान मिळवले आहे. गाझियाबाद आणि जयपूर सारख्या शहरांनी साइनअप आणि इतर अॅक्टीव्हीटीच्या बाबतीत अनेक मोठ्या शहरांना मागे टाकले आहे.

विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ का?

अ‍ॅशले मॅडिसनच्या मते, ही रँकिंग केवळ नवीन वापरकर्त्यांच्या साइनअपवर आधारित नसून, वेबसाइटवरील त्यांच्या अॅक्टीव्हीटीवर, वारंवारता आणि सहभागाचा देखील विचार करते. कंपनीने हेही म्हटले आहे की, विवाहबाह्य संबंध धोकेबाजी (infidelity) किंवा एकाकीपणाच्या (loneliness) वाढत्या समस्येचे हे आकडे मुख्य कारण आहेत.

या गोष्टी जास्त कारणीभूत

मोबाईल, अती संपर्क, सातत्याने होणारी चॅटींग, डेटींग अॅप्स, विभक्त कुटुंब पद्धती, सोशल मीडियावर सहज आणि सातत्याने होणारा संवाद, आर्थिक प्रलोभनं आणि अलिशान जीवनशैली, पैशांचा हव्यास, लैंगिक संबंधांची चटक अशा अनेक काही गोष्टी आहेत, ज्या विवाहबाह्य संबंधात वाढ होत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+