Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, 1500 किमी दूर बसलेल्या शत्रू काही क्षणात होईल नष्ट

DRDO Hypersonic Missile: भारताने प्रथमच हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे. DRDO ने 16 नोव्हेंबर 2024 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. APJ अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.

DRDO s long range hypersonic missile

हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र भारतीय सशस्त्र दलांच्या सर्व सेवांसाठी 1500 किमी पेक्षा जास्त अंतरापर्यंत विविध पेलोड वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे क्षेपणास्त्र 1500 किमी दूर बसलेल्या शत्रूला नष्ट करण्यास सक्षम आहे. हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र डॉ. एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुल, हैदराबादच्या प्रयोगशाळांसह DRDO आणि उद्योग भागीदारांच्या विविध प्रयोगशाळांनी स्वदेशी विकसित केले आहे. डीआरडीओ आणि सशस्त्र दलातील वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत उड्डाणाची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

हायपरसॉनिक क्षेपणास्त्रावर राजनाथ सिंह काय म्हणाले?

हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून भारताने मोठी कामगिरी केली आहे." हा एक ऐतिहासिक क्षण आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीने आपल्या देशाला अशा महत्त्वपूर्ण आणि प्रगत लष्करी तंत्रज्ञानाची क्षमता असलेल्या देशांच्या गटात स्थान मिळवलं आहे. या अद्भुत कामगिरीबद्दल मी टीम डीआरडीओ आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन करतो", असं ट्टिट केलं आहे.

हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये

हायपरसोनिक क्षेपणास्त्रे वरच्या वातावरणात ध्वनीच्या वेगापेक्षा पाचपट जास्त वेगाने प्रवास करते. म्हणजेच जवळपास 6,200 किमी प्रति तास (3,850 mph) वेगाने प्रवास करते. दरम्यान त्याचा वेग आंतरखंडीय क्षेपणास्त्रापेक्षा कमी आहे. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रामध्ये फ्रॅक्शनल ऑर्बिटल बॉम्बर्डमेंट सिस्टम (एफओबीएस) आणि रिएक्शन टाइम आणि पारंपारिक डिफेंस सिस्टम शत्रूंवर भारी पडते.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+