देशातील पहिली महिला डाॅक्टर कोण? 9व्या वर्षी लग्न प्रसुतीनंतर मुलाचा मृत्यू, जिद्दीनं बनल्या डाॅक्टर
Doctor's Day 2025 : 1 जुलै डाॅक्टर दिवस म्हणून साजरा करतात. प्रसिद्ध डाॅक्टर आणि स्वातंत्र्यसैनिक तथा राजकारणी असलेल्या बिधान चंद्र राॅय यांच्या स्मरणार्थ डाॅक्टर डे साजरा केला जातो. त्यांचा जन्म 1 जुलै रोजी झाला होता. त्यामुळे हा दिवस डाॅक्टर डे म्हणून भारत सरकारने जाहीर केला आहे.

का साजरा करतात डाॅक्टर डे?
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील मोलाचे योगदान दिल्यामुळे डाॅ. बिधान चंद्र राॅय यांना आदरांजली म्हणून केंद्र सरकारने हा दिवस डाॅक्टर डे म्हणून 1 जुलै 1991 या वर्षी घोषित केला आहे.
देशातील पहिल्या महिल्या डाॅक्टर कोण आहेत?
देशातील पहिल्या महिला डाॅक्टर आनंदीबाई जोशी यांना मानले जाते. त्यांचा जन्म पुण्यात त्यांच्या आजोळी 31 मार्च 1865 मध्ये झाला. त्या गणपतराव जोशी यांच्या कन्या होत्या.
वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे असलेल्या तत्कालीन अहमदनगर येथील गोपाळराव जोशी यांच्याशी झाला.
वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांची प्रसुती झाली, तेव्हा वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मुलं फक्त दहा दिवस जगले होते, या घटनेनंतर त्यांना धक्का बसला आणि डाॅक्टर होण्याचे ध्येय ठरवले.

आनंदी बाई यांच्या पतीचाही आग्रह होता की, पत्नीने डाॅक्टर बनावे त्यामुळे त्यांनी अमेरिकेत वैद्यकीय शिक्षणासाठी चाचपणी सुरु केली, सुरुवातीला आनंदी बाईंना डाॅक्टर होण्यास मोठा विरोध समाजात झाला होता. त्यांना अनंत, अडचणी आणि संघर्ष करावा लागला.
जेव्हा आनंदीबाईंना धर्मांतर करा मग डाॅक्टर होता येईल अशी संधी दिली गेली तेव्हा त्यांनी ती ठामपणे नाकारली. स्वःधर्माचा पुरस्कार करत गोपाळराव आणि आनंदी बाईंनी ही संधी नाकारली. यानंतर आनंदी बाईंनी एक प्रभावी भाषण केले, आणि धर्मांतर न करता शिक्षण घ्यायचे असाच निश्चय आहे हे लोकांसमोर स्पष्ट केले, यानंतर त्यांना भारतातून आर्थिक मदत मिळाली आणि त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम पुर्ण केला आणि त्या एमडी झाल्या.
अवघ्या 21 वर्षाच्या काळात आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी आदर्श उभा केला, पण त्यांच्या आनंदीबाईंच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही.
आनंदी बाईंबद्दलची शोकांतिका..
स्वतः डॉक्टर होऊनही कुणा देशभगिनीवर उपचार करण्याची संधी आनंदीबाईंना मिळालीच नाही. अमेरिकेत मात्र कारपेंटर यांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात त्यांची लहानशी समाधी बांधली. त्यावर 'आनंदी जोशी, परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री' अशी अक्षरे कोरून त्यांचे स्मारक करण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications