Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दिल्लीकरांना पुन्हा धडकी! महापालपूरमध्ये स्फोटाचा 'धमाका' जाणून घ्या नेमकं काय घडलं, ताजे अपडेट

Delhi Blast Sound Near Radisson Hotel : राजधानी दिल्लीत काही दिवसांपूर्वी लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमीवर, आज (गुरुवार, १३ नोव्हेंबर २०२५) सकाळी महिपालपूर परिसरात पुन्हा एकदा 'स्फोटा'सारखा मोठा आवाज ऐकू आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. रेडिसन हॉटेलजवळ हा आवाज ऐकू येताच, पुन्हा 'दिल्ली पुन्हा धमाका' झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, पोलिसांनी तातडीने तपास करून हा आवाज DTC बसचा टायर फुटल्यामुळे आल्याचे स्पष्ट केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Delhi Blast Sound Near Radisson Hotel Mahipalpur

घटना कशी घडली?

आज सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी महिपालपूर येथील रेडिसन हॉटेलजवळ स्फोटासारखा मोठा आवाज आला. मागील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी लगेच अग्निशमन दलाला फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

स्फोट की अजून काय?

पोलिसांनी परिसराची कसून तपासणी केली. सुरक्षारक्षक आणि स्थानिकांकडून चौकशी केल्यावर हा आवाज धौला कुआँच्या दिशेने जाणाऱ्या डीटीसी (DTC) बसचा मागील टायर मोठ्या आवाजात फुटल्यामुळे आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा परिस्थिती आढळली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे घबराटीचे वातावरण असले तरी, आता परिस्थिती सामान्य झाली आहे.

लाल किल्ला स्फोट दहशतवादी हल्ला घोषित

केंद्र सरकारने लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले आहे. या गंभीर घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणाकडे सोपवण्यात आला आहे. या स्फोटात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

स्फोटकांचे स्वरूप

फॉरेन्सिक तपासानुसार, स्फोटात अमोनियम नायट्रेट आणि उच्च दर्जाचे विस्फोटक वापरले गेले होते. स्फोट झालेल्या ह्युंदाई i20 कारमध्ये तब्बल ८० किलो स्फोटक होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अटकसत्र आणि मॉड्यूल

दिल्ली पोलीस आणि तपास यंत्रणांनी याप्रकरणी आतापर्यंत अनेक संशयितांना अटक केली आहे. फरिदाबादमधून कार्यरत असलेल्या एका 'व्हाइट कॉलर' दहशतवादी नेटवर्कचा यात सहभाग असल्याचे समोर आले आहे, ज्यात डॉक्टर, मौलवी आणि उच्चशिक्षित व्यावसायिक लोकांचा समावेश आहे.

हेही वाचा :

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+