Delhi Schools: दिल्लीतील वायू प्रदूषणाची धोकादायक पातळी, 10वी-12वी वगळता सर्व शाळा बंद
Delhi Air Pollution: दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी (AQI) धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. हे पाहता दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी दहावी आणि 12 वी वगळता इतर सर्व विद्यार्थ्यांचे फिजिकली शाळा बंद करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. सोमवारपासून दिल्ली-एनसीआरमध्ये जीआरएपी-4 लागू झाल्यानंतर लगेचच शाळांबाबत दिल्ली सरकारचा हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री आतिशी यांनी आपल्या सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटलं आहे की, 'GRAP-4 च्या अंमलबजावणीमुळे 10वी आणि 12वी वगळता सर्व विद्यार्थ्यांसाठी फिजिकली वर्ग बंद केले जातील. पुढील आदेशापर्यंत सर्व शाळा ऑनलाइन वर्ग आयोजित केल्या जातील." GRAP-4 निर्बंधांमुळे शाळा ऑनलाइन मोडवर शिफ्ट केल्या जातील. दरम्यान शाळांमध्ये 10वी आणि 12वीचे वर्ग फिजिकल पद्धतीने सुरू राहणार आहेत.
With the imposition of GRAP-4 from tmrw, physical classes shall be discontinued for all students, apart from Class 10 and 12. All schools will hold online classes, until further orders.
— Atishi (@AtishiAAP) November 17, 2024
गोपाल राय GRAP IV वर बैठक घेणार
GRAP IV च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय सोमवारी सर्व संबंधित विभागांच्या विभाग प्रमुखांची बैठक घेणार आहेत, असे त्यांच्या कार्यालयाने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे. सोमवारी दुपारी दिल्ली सचिवालयात ही बैठक होणार आहे.
दिल्ली-NCR मधील हवेच्या दर्जा खालावल्यामुळे कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) ने सोमवारपासून ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) चा चौथा टप्पा सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे, जो सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून लागू होईल. GRAP-4 अंतर्गत दिल्लीत ट्रकच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच फक्त अत्यावश्यक सेवा प्रदान करणाऱ्या सर्व एलएनजी, सीएनजी, इलेक्ट्रिक, बीएस-6 डिझेल ट्रकना प्रवेश दिला जाणार आहे.
दिल्लीत 'सिव्हियर प्लस' AQI
सोमवारी सकाळी 6 वाजता हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 481 वर होता. ज्याला 'गंभीर प्लस' म्हणून वर्गीकृत केले जाते. याचे आरोग्यावर गंभीर परिणाम आहेत. देशाच्या राजधानीत AQI 457 वर पोहोचल्यानंतर रविवारी संध्याकाळी आपत्कालीन उपायांची घोषणा करण्यात आली. यापूर्वी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार रविवारी दुपारी 4 वाजेपर्यंत, दिल्लीचा AQI वेगाने वाढून 441 वर पोहोचला, जो 7 वाजेपर्यंत 457 पर्यंत वाढला होता.












Click it and Unblock the Notifications