ऑडिओ ऐकून टाईप करायचं टेन्शन संपलं! व्हाॅट्सअॅप व्हाईसनोट होईल टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट
Convert WhatsApp Voice Messages to Text : इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपमध्ये 'व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्ट्स' फीचर नावाने एक नवीन आणि मनोरंजक फीचर जोडण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने कोणतीही ऑडिओ नोट टेक्स्टमध्ये रूपांतरित केली जाऊ शकते.
या लेटेस्ट फिचरची खास गोष्ट म्हणजे यूजर्सना व्हिडिओ ऐकण्याचीही गरज भासणार नाही आणि ते टेक्स्ट मेसेजप्रमाणे वाचू शकतील. कंपनीने ही सुविधा अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीसाठी सुरू केली आहे. युजर्सं व्हिडिओ ऑडीओ ऐकताना गोंगाट असेल तर अशा ठिकाणी हे फिचर वापरणे अधिक फायदेशीर ठरेल. अशा परिस्थितीत, युजर्स ऑडिओ न ऐकता टेक्स्ट कन्व्हर्ट होताच हा संदेश सहजपणे वाचता येणार आहे.

व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्ट्स फीचर कसे वापरता येईल
- या फिचरसाठी तुम्हाला व्हॉट्सॲपचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करावे लागेल.
- यानंतर, व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर, तुम्हाला चॅट विभागात जावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्ट फिचरचा पर्याय दिसेल. तुम्हाला त्याच्या समोर दिसणारे टॉगल सक्षम करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला ट्रान्सक्रिप्शनसाठी तुमची भाषा निवडावी लागेल.
- यानंतर हे फीचर ॲक्टिव्हेट होईल आणि तुम्हाला ते अगदी सहज वापरता येईल.
- तुम्हाला फक्त व्हॉईस मेसेजवर लांब टॅप करायचा आहे, त्यानंतर तुम्ही तुमच्या स्क्रीनवरील टेक्स्ट मेसेजप्रमाणे ऑडिओ मेसेज वाचू शकाल.
प्रायव्हसीची काळजी करायचे काम नाही!
कन्व्हर्टची संपूर्ण प्रक्रिया केवळ युजर्सच्या डिव्हाइसवरच होते आणि हे व्हॉइस संदेश कोणत्याही बाह्य सर्व्हरवर पाठवले जाऊ शकत नाहीत. यामुळे युजर्सना संपूर्ण गोपनीयता मिळते आणि व्हॉट्सॲप युजर्सचे व्हॉईस मेसेज देखील ऍक्सेस करू शकत नाही. एकूणच, व्हॉट्सॲपचे हे वैशिष्ट्य पूर्णपणे गोपनीयतेवर केंद्रित आहे.
व्हॉट्सॲपकडू सांगण्यात आले की, ट्रान्सक्रिप्शन दिसण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. कंपनीने असेही म्हटले आहे की, जर युजर्संना ट्रान्सक्रिप्ट अनुपलब्ध एरर दिसली तर याचा अर्थ असा होतो की ट्रान्सक्रिप्ट भाषा असमर्थित आहे किंवा पार्श्वभूमीत खूप आवाजामुळे शब्द ओळखू शकत नाही किंवा व्हॉइस संदेश भाषा समर्थित नाही. यासोबतच कंपनीने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे, कारण व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्शन चुकीची असण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications