ओवेसींची खासदारकी धोक्यात? शपथ ग्रहण करताना केली होती ही चूक, वाचा सविस्तर

नवी दिल्ली: एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची खासदारकी धोक्यात आली आहे. शपथ ग्रहण करताना ओवेसी यांनी पॅलेस्टाईनचे घेतलेलं नाव त्यांना आता भोवण्याची शक्यता आहे. नेमकं काय घडलं होतं? त्याबाबत नियम काय सांगतात जाणून घेऊयात सविस्तर

नेमकं काय घडलं?

संसदेत खासदार पदाची शपथ ग्रहण करताना एम आय एमचे राष्ट्रीय अध्यक्ष ओवेसी यांना पॅलेस्टाईनच्या समर्थनाचा नारा दिला होता. शपथ घेतल्यानंतर ओवेसी यांनी जय भीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईन अशा आशयाची घोषणा दिली होती.

owaisi statement on palestine

त्यानंतर राजकीय वर्तुळातून विशेष म्हणजे भाजपाकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी देखील प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, ही बाब अयोग्य असल्याचं मुर्मू यांनी नमूद केलं आहे.

असं असेल तरी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा मुद्दा संसदेच्या पटलावरून सध्या तरी हटवला आहे. त्यामुळे ओवेसी विरोधकांच्या दबावानंतर पुढे नेमकी काय घडामोड घडती आहे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नेमकी कशी होऊ शकते कारवाई?

अनेक वरिष्ठ वकील ओवेसी यांची खासदारकी रद्द करा, अशी मागणी करताना दिसत आहेत. यासाठी संविधानाच्या कलम 102 चा हवाला दिला जात आहे.

संबधित घटना संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी घडली. ओवेसी यांनी दिलेला हा नारा पकडत भाजपच्या खासदारांनी राजकीय आरोप केला. आणि खासदार पदावर राहण्याचा ओवेसी यांना अधिकार नसल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाचे वकील हरी शंकर जैन राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्याकडे या कारवाई बाबत पाठपुरावा करत आहेत.

शपथ घेताना दुसऱ्या देशाचं नाव घेणं खरं कायद्याच्या विरोधात आहे का? आजवर शपथ घेणाऱ्या सर्व खासदार आणि राज्यसभा सदस्यांनी केवळ आपल्या देशाचं नाव घेतलं आहे. ओवेसी यांनी पॅलेस्टाईन नाव घेत या संपूर्ण परंपरेला मूठमाती दिली. परिणामी, ओवेसी यांची खासदारकी आता अडचणीत सापडली आहे.

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रकरणाची गंभीर दाखल घेतली आहे. यामध्ये आपण सर्व नियम तपासणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पॅलेस्टाईन आपला दुश्मन नाही, पण शपथ ग्रहण करताना दुसऱ्या देशाचं नाव घेणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आता ओवेसी यांच्यावर नेमकी काय कारवाई होतीय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+