गुप्त राजकारण?, 2008मध्ये बीजिंगमधील गांधी-भुट्टो परिवारातील भेटीचे काँग्रेस स्पष्टीकरण देईल का?
Congress, Gandhi-Bhutto Meet in Beijing 2008 : 2008मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या भुट्टो-गांधी कुटुंबाच्या बैठकीबद्दल आणि त्यानंतर काँग्रेस पक्ष आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीने चिनी कम्युनिस्ट पक्षासोबत केलेल्या करारांबद्दल काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आता पुन्हा केली जाऊ लागली आहे. नेमकी ही भेट का झाली होती, तब्बल 18 वर्षानंतर हा मुद्दा पुन्हा का चर्चेत आला, यासह असंख्य प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, 2008 च्या बीजिंग ऑलिंपिकचे आयोजन चीनच्या वतीने करण्यात आले. ग्लोबल लीडर्स या उद्देशाने चीनने खेळ, राजनैतिकता आणि आंतरराष्ट्रीय सहभागाचे भव्य प्रदर्शन केले. परंतु स्टेडियमच्या प्रकाशझोतापासून दूर, दक्षिण आशियातील दोन प्रमुख राजकीय कुटुंबांमध्ये यावेळी झालेली बैठक ही खास चर्चेचा विषय राहिली होती.

ऑलिंपिक खेळांच्या उद्घाटन समारंभासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा हे देखील उपस्थित होते. त्याचवेळी, पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी, त्यांच्या बहिणी बख्तावर आणि आसिफा आणि जहांगीर बदर आणि रहमान मलिक यांच्यासह पीपीपीचे वरिष्ठ नेते देखील चीनच्या राजधानीत उपस्थित होते.
वृत्तांनुसार, दोन्ही शिष्टमंडळे ऑलिंपिकच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (CPC) निमंत्रणावरून बीजिंगमध्ये गेले होते. दुसरीकडे, गांधी आणि भुट्टो कुटुंबे ही त्यांच्या देशातील ऐतिहासिकदृष्ट्या प्रभावशाली होती. या दोन्ही कुटुंबामध्ये सुमारे 30 मिनिटे एक संक्षिप्त बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी भुट्टो भावंडांना त्यांच्या आई तथा माजी पाकिस्तानी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येबद्दल देखील शोक व्यक्त केला होता.
दरम्यान, त्यावेळी सार्वजनिक निवेदनांमध्ये, रहमान मलिक यांनी ही बैठक केवळ वैयक्तिक भेटीच्या अनुषंगाने झालेली होती. यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नव्हती, असा दावा देखील करण्यता आला. मलिक यांनी सांगितले होते की, कौटुंबिक आठवणी आणि सद्भावनेचा संदेश यावर आधारीतच ही बैठक होती, असे स्पष्टीकरण दिले गेले होते.

काही माध्यमांचा दावा- कॉंग्रेस अन् पीपीपीमध्ये सामंजस्य करार
दरम्यान, या भेटीनंतर अनेक माध्यमांच्या वृत्तांतात असाही दावा करण्यात आला आहे की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) ने सीपीसीसोबत एक सामंजस्य करार (MOU) केला आहे, ज्यामुळे राजकीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींवर सल्लामसलत करण्याची परवानगी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, या सामंजस्य करारातील मजकूर कधीही पूर्णपणे सार्वजनिक केला गेला नाही, तरी तो राजकीय हिताचा विषय राहिलेला आहे. त्याचबरोबर अनेक अहवालांमध्ये असाही दावा करण्यात आला की, पाकिस्तान पीपल्स पार्टीने त्या वर्षाच्या अखेरीस सीपीसीसोबत असाच काहीसा करार केला होता, त्याचा औपचारिक तपशील अद्याप समोर आलेले नाही.

दरम्यान, आता, 18 वर्षे या घटनेला उलटून गेले तरी देखील अजूनही या बैठकीसंदर्भात कायम चर्चा होतेच. अशातच, या बैठकीचा एक फोटो सोशल मीडियावर पुन्हा एकदा समोर आला आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा यासंदर्भातील वादविवाद होऊ लागले आहेत. गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर या बैठकीचे फोटो व्हायरल झाले. विशेषतः भारत आणि पाकिस्तानमधील सबंध तणावग्रस्त असताना हे फोटो समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
विशेष बाब म्हणजे, तत्कालीन झालेली ही बैठक अधिकृत राजकीय कार्यक्रमाचा भाग नसली तरी देखील, ती चीनच्या भूमीवर, सीपीसीच्या निमंत्रणाखाली झाली आणि त्यात प्रादेशिक प्रभावाचा दीर्घ इतिहास असलेल्या दोन राजकीय राजवंशांचे वारस सहभागी झाले होते, यामुळे जनतेत या बैठकीविषयी कायमच उत्सुकता निर्माण झाली आहे.
Sonia, Rahul, Priyanka had meeting with Bhuttos at Beijing in 2008.
— Ankur Singh (@iAnkurSingh) May 21, 2025
Neither of them were Prime Minister or any Minister in Govt.
Why did they meet?
So much love and bonding? pic.twitter.com/OGl4nRMgTo
काही टीकाकार आणि नेटकऱ्यांनी काँग्रेस पक्षाला बैठकीचा उद्देश आणि संदर्भ स्पष्ट करण्यास सांगितले आहे, विशेषतः आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत-पाकिस्तान विभाजनाच्या दोन्ही बाजूंच्या उच्चस्तरीय राजकीय व्यक्तींचा त्यात समावेश असल्याने, याचे स्पष्टीकरण कॉंग्रेस करेल का, असा सवाल नेटकऱ्यांकडून व विरोधकांकडून केला जात आहे.
व्हायरल झालेल्या या फोटोंविषयी काँग्रेसकडून अद्याप कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया आलेली नाही. पोस्टला लोकप्रियता मिळत असताना, एकेकाळी केवळ शोकसभा म्हणून वर्णन केलेली गोष्ट आता चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी होऊ लागली आहे. पडद्यामागील संभाव्य राजकीय अर्थ आणि गुप्त संवादांवर लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसने स्पष्टपणे समोर येऊन आजच्या वातावरणात त्या बैठकीचे स्पष्टीकरण केले पाहिजे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.












Click it and Unblock the Notifications