Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Christmas 2025 Recipe : ख्रिसमसनिमित्त घरच्या घरी बनवा 'या' 3 खास रेसिपीज; सणाचा गोडवा होईल दुप्पट!

Christmas 2025 Special 3 Famous Recipes : ख्रिसमस (नाताळ) म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे सजलेला ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज आणि जिभेवर रेंगाळणारी केक-कुकीजची चव. नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या ख्रिसमसला बाजारातून महागडे पदार्थ आणण्यापेक्षा घरच्या घरी कमी साहित्यात चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तीन खास जास्त केल्या जाणाऱ्या रेसिपीज.

Christmas 2025 Recipe

१. पारंपारिक नाताळ स्पेशल 'प्लम केक'

ख्रिसमस प्लम केकशिवाय अपूर्णच आहे. हा केक त्याच्या डार्क रंग आणि ड्रायफ्रूट्सच्या रिच चवीसाठी ओळखला जातो.

साहित्य: १ कप मैदा, १/२ कप बटर, १ कप साखर, (अंडी खात असाल तर २ अंडी), १ चमचा बेकिंग पावडर, १/२ चमचा दालचिनी पावडर, संत्र्याचा रस, काजू, बदाम, मनुका आणि टूटी-फ्रुटी.

कृती: सर्वप्रथम सर्व ड्रायफ्रूट्स संत्र्याच्या रसात किमान २-३ तास भिजवून ठेवा. एका भांड्यात बटर आणि साखर फेटून त्यात मैदा, बेकिंग पावडर आणि मसाल्यांचे मिश्रण टाका. भिजवलेले ड्रायफ्रूट्स त्यात मिसळा आणि प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये किंवा कुकरमध्ये ४०-४५ मिनिटे बेक करा. तुमचा मऊ आणि चविष्ट प्लम केक तयार!

२. कुरकुरीत 'जिंजरब्रेड कुकीज'

लहान मुलांच्या अत्यंत आवडीच्या असलेल्या या कुकीज ख्रिसमसची खरी शोभा वाढवतात.

साहित्य: ३५० ग्रॅम मैदा, १०० ग्रॅम बटर, १०० ग्रॅम गूळ किंवा ब्राऊन शुगर, १ अंडे, २ चमचे आले (जिंजर) पावडर, १ चमचा दालचिनी पावडर.

कृती: बटर आणि साखर एकत्र करून त्यात अंडे फेटून घ्या. आता यात मैदा, आले पावडर आणि दालचिनी पावडर घालून गोळा तयार करा. हा गोळा लाटून त्याला 'जिंजरब्रेड मॅन' किंवा स्टारच्या आकारात कापून घ्या. १८० अंश सेल्सिअसवर १०-१२ मिनिटे बेक करा.

३. झटपट 'चॉकलेट बर्फी' (No-Bake Chocolate Barfi)

ज्यांना बेकिंग कठीण वाटते, त्यांच्यासाठी ही एक उत्तम स्वीट डिश आहे.

साहित्य: ५०० ग्रॅम खवा, ३०० ग्रॅम पिठीसाखर, ५०-१०० ग्रॅम कोको पावडर किंवा चॉकलेट, वेलची पावडर आणि सुका मेवा.

कृती: मंद आचेवर खवा भाजून घ्या. त्यात साखर आणि वेलची पावडर मिसळा. या मिश्रणाचे दोन भाग करा, एका भागात कोको पावडर मिसळा. एका ताटाला तूप लावून आधी साधा खव्याचा थर लावा आणि त्यावर चॉकलेट मिश्रणाचा थर देऊन फ्रिजमध्ये सेट करा. थंड झाल्यावर वड्या पाडा.

महत्वाची टीप: जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स किंवा चॉकलेट आणि साखरेचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+