Chocolate Day 2026: 'चॉकलेट डे'ला घरीच बनवा शुद्ध चॉकलेट; जोडीदारासाठी खास 'गिफ्ट आयडियाज' वाचा
Chocolate Day 2026 Creative Gift Ideas and Easy Homemade Chocolate Recipe : व्हॅलेंटाईन वीकचा सर्वात गोड दिवस म्हणजेच 'चॉकलेट डे' आज उत्साहात साजरा होत आहे. चॉकलेट हे केवळ खाण्याची वस्तू नसून ती प्रेम व्यक्त करण्याची एक भाषा आहे. अनेकदा बाजारात मिळणाऱ्या चॉकलेट्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेत तुम्ही घरीच शुद्ध चॉकलेट बनवून त्यांना सुखद धक्का देऊ शकता.

१. घरगुती चॉकलेट रेसिपी (Homemade Chocolate Recipe)
घरच्या घरी चॉकलेट बनवणे अतिशय सोपे आहे. यासाठी तुम्हाला गॅस पेटवण्याचीही फारशी गरज भासणार नाही.
- साहित्य:
- कोको पावडर: १ कप
- खोबरेल तेल किंवा बटर: अर्धा कप
- मध किंवा पिठीसाखर: चवीनुसार (मध वापरणे अधिक आरोग्यदायी)
- व्हॅनिला इसेन्स: ४-५ थेंब
- ड्राय फ्रूट्स: बदाम, काजू किंवा मनुके (ऐच्छिक)
कृती:
- १. डबल बॉयलर पद्धत : एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. त्यावर दुसरे लहान भांडे ठेवा (लहान भांडे पाण्याला टेकू नये).
- २. वरच्या भांड्यात बटर किंवा खोबरेल तेल वितळवून घ्या.
- ३. त्यात चाळलेली कोको पावडर आणि मध घालून चमच्याने सतत हलवत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
- ४. मिश्रण एकजीव आणि चमकदार झाल्यावर त्यात व्हॅनिला इसेन्स आणि आवडीनुसार ड्राय फ्रूट्सचे तुकडे टाका.
- ५. आता हे मिश्रण चॉकलेट मोल्डमध्ये (Mould) ओता.
- ६. हे मोल्ड २ ते ३ तास फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवा. तुमचे शुद्ध आणि घरगुती चॉकलेट तयार!
२. चॉकलेट डे खास गिफ्ट आयडियाज (Unique Gift Ideas)
केवळ डेअरी मिल्कचा मोठा बॉक्स देण्यापेक्षा काहीतरी 'हटके' देऊन तुम्ही हा दिवस संस्मरणीय बनवू शकता.
चॉकलेट बुके : फुलांच्या जागी विविध प्रकारच्या चॉकलेट्सचा बुके तयार करून द्या. यात तुम्ही जोडीदाराच्या आवडीची सर्व चॉकलेट्स लावू शकता.
कस्टमाइज्ड चॉकलेट बार: आजकाल चॉकलेटच्या रॅपरवर जोडीदाराचा फोटो किंवा त्यांचे नाव छापून घेण्याची सोय उपलब्ध आहे. यामुळे ते गिफ्ट अधिक वैयक्तिक वाटते.
चॉकलेट हॅम्पर : एका टोपलीमध्ये डार्क चॉकलेट, नट्स चॉकलेट आणि हॉट चॉकलेट पावडरचे पाकीट एकत्र करून एक सुंदर बास्केट गिफ्ट करा.
मेसेज चॉकलेट्स: छोट्या चॉकलेटच्या तुकड्यांवर 'I Love You' किंवा 'Sweetest Person' असे अक्षरे कोरलेली चॉकलेट्स मिळतात, ती खूप ट्रेंडिंग आहेत.
हेही वाचा : Happy Chocolate Day 2026 नात्यात विरघळेल प्रेमाचा गोडवा! 'चाॅकलेट डे च्या पाठवा 'या' 20 गोड शुभेच्छा












Click it and Unblock the Notifications