सावधान! सरकारी कर्मचाऱ्यांनो ChatGPT आणि DeepSeek वापरू नका, केंद्राने का दिला थेट इशारा
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या वतीने मोठा आदेश काढण्यात आलेला आहे. ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना एआय अँप आणि प्लॅटफॉर्मबाबत आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत.
जारी करण्यात आलेल्या आदेशात कर्मचाऱ्यांना सांगितले गेले की, बरेच लोक ऑफिसच्या संगणक आणि लॅपटॉपवर एआय अँप (ज्यामध्ये प्रामुख्याने चॅटजीपीटी, डीपसीक यासह अन्य) वापरत आहेत. जे गोपनीय कागदपत्रे आणि डेटासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे या पुढे कोणीही कार्यालयीन संगणकावर कोणत्याही प्रकारचे एआय अँप वापरू नयेत. जेणेकरून सरकारी डाटा सुरक्षित राहू शकतो.

केंद्र सरकारने काय काढले आदेश?
केंद्र सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सरकारी संगणक, लॅपटॉप आणि उपकरणांमध्ये एआय अँप आणि टूल्सचा वापर करू नये. डेटा आणि गोपनीयतेला प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, याद्वारे एआय युझर्सना निराश करण्याची अजिबात मानसिकता नाहीये.
शासनाने का घेतला असा निर्णय?
भारतात अनेक परदेशी एआय अँप उपलब्ध आहेत, ज्यात चॅटजीपीटी, डीपसीक आणि गुगल जेमिनी इत्यादींची नावे आहेत. भारतातील बरेच लोक त्यांचे काम सोपे करण्यासाठी त्यांचा वापर करतात. डिव्हाइसवर एआय अँप किंवा टूल्स इन्स्टॉल केल्यानंतर, ते आवश्यक परवानग्या मागतात. अशा परिस्थितीत सरकारी फायलींचा डेटा लीक होण्याचा धोका कायम आहे.
एआय अँप आणि एआय चॅटबॉटच्या मदतीने, बरेच लोक प्रॉम्प्ट देऊन पत्रे, लेख किंवा भाषांतर इत्यादी काम करू शकतात. बरेच लोक प्रेझेंटेशन इत्यादी करण्यासाठी देखील याचा वापर करतात. येथे वापरकर्त्यांना एक साधा टेक्स्ट प्रॉम्प्ट द्यावा लागेल.
डीपसीक एक चीनी स्टार्टअप अँप
डीपसीक लोकप्रिय आहे. चिनी स्मार्ट स्टार्टअप डीपसीकला अलिकडेच लोकप्रियता मिळाली आहे आणि या स्टार्टअपने त्याच्या परवडणाऱ्या किमतींमुळे उद्योगात खळबळ उडवून दिली आहे. हे चिनी स्टार्टअप सुमारे 20 महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. 20 जानेवारी 2025 रोजी, डीपसीक R1 चॅटबॉट अचानक खूप लोकप्रिय झाले आणि जुन्या एआय कंपन्यांचे त्याने अनेक रेकॉर्ड तोडले.












Click it and Unblock the Notifications