पोटनिवडणुकीतही भाजपचाच बोलबाला; विधानसभेच्या 46 पैकी 24 जागांवर विजय
By-Election Result 2024- महाराष्ट्र व झारखंड विधानसभेचा आज निकाल लागला. त्याचबरोबर देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीचाही निकाल आज लागला. देशभरात चर्चेच असलेल्या महाराष्ट्राची विधानसभा महायुतीने विक्रमी जागांनी जिंकली. भाजपचा हाच स्ट्राईकरेट पोटनिवडणुकीतही कायम राहिला. 15 राज्यांतील 46 विधानसभा आणि 2 वायनाड आणि नांदेड या दोन लोकसभेच्या जागांवरच्या पोटनिवडणुकीचा निकालही आज लागला.

लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसकडे
वायनाड लोकसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला. त्यात प्रियंका गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघात 4 लाख 10 हजार मतांनी विजय मिळवला. त्यांना एकूण 6 लाख 22 हजार 338 मते मिळाली. येथे सीपीआयचे सत्यन मोकेरी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 2 लाख 11 हजार मते मिळाली. तर भाजपच्या नव्या हरिदास या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या त्यांना 1 लाख 9 हजार मते मिळाली. महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा जागेवर भाजपचे संतुक हंबर्डे यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांनी त्यांचा 1457 मतांनी पराभव केला. हा निकाल उशीरा जाहीर करण्यात आला.
पोटनिवडणुकीत भाजपचा बोलबाला
विधानसभेच्या 46 जागांसाठी पोटनिवडणुक झाली होती. त्या जागांचा निकालही आज जाहीर झाला. त्या 46 जागांपैकी 24 जागा भाजप महायुतीने जिंकल्या. काँग्रेसला 7 जागा मिळाल्या. त्याखेरीज टीएमसी 6, सपा 3, आप 3, सीपीआय-एम, नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि भारत आदिवासी पक्ष यांना प्रत्येकी 1 जागेवर समाधान मानावे लागले. भाजप युतीमध्ये JDU, हिंदुस्थान अवाम मोर्चा (HAM), आसाम गण परिषद (AGP), युनायटेड पीपल्स पार्टी (UPP) आणि राष्ट्रीय लोक दल (RLD) यांचा समावेश होता.
भाजपचा स्ट्राईकरेट सुधारला
पोटनिवडणुक झालेल्या 46 पैकी 27 जागा यापूर्वी विरोधकांकडे होत्या. त्यापैकी एकट्या काँग्रेसला 13 जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी एनडीएकडे भाजपच्या 11 जागांसह एकूण 17 जागा होत्या. अशा प्रकारे भाजप आघाडीला एकूण 7 जागांचा फायदा झाला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले वनमंत्री रामनिवास रावत यांचा मध्य प्रदेशातील विजयपूर मतदारसंघातून पराभव झाला. उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या 9 जागांपैकी भाजप आघाडीने 7 तर सपाला 2 जागा मिळाल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications