Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दीडशे फूट खोल दरीत बस कोसळून 36 जण ठार; मन हेलावून टाकणारा अपघात, बचावकार्य सुरू

Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडमधील अल्मोडा भागात सोमवारी एक बस सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळली आहे. यात बसमधील 36 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्मोडा येथील कुपीजवळ हा अपघात झाला. बसमध्ये एकूण 42 प्रवासी होते. या बस अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला तर मृतांचा आखडा देखील वाढण्याची शक्यता आहे. कुमाऊं विभागाचे आयुक्त दीपक रावत म्हणाले- अपघातात 36 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. नदीच्या 10 फूट आधी झाडात बस अडकली होती. बस दरीत कोसळताना अनेक धक्के लागल्याने प्रवासी खिडक्याबाहेर फेकले गेले. ऑन दी स्पॉट 28 जणांचा जीव गेला होता. तर 8 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

Uttarakhand Bus Accident

स्थानिक प्रवाशी असल्याचा दावा

दिवाळीच्या सुट्टीनंतर सोमवार हा पहिलाच आहे. त्यामुळे बस पूर्ण भरली होती. बहुतेक स्थानिक लोक बसमध्ये होते. अल्मोडा एसपी आणि नैनितालचे पोलिस दल घटनास्थळी पोहोचले आहेत. एसआरएफची टीमही बचावकार्यात गुंतली आहे. ही बस गढवाल मोटर्स ओनर्स युनियन लिमिटेडची असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात बस खूपच जीर्ण असल्याचे समोर आले आहे.

एआरटीओ निलंबित

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आयुक्तांनी कुमाऊं विभागाला या घटनेची दंडाधिकारी चौकशी करण्याचे निर्देश दिले. पौरी आणि अल्मोडा येथील एआरटीओ अंमलबजावणी निलंबित करण्यात आली आहे.

जखमींना एअरलिफ्ट करुन उपचारासाठी नेले

मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना आता रामनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथून गंभीर जखमींना एअरलिफ्ट करून हल्द्वानी येथे हलवण्यात येणार आहे. काही जखमींना ऋषिकेश एम्समध्ये पाठवण्यात आले आहे. त्याचवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथकही हेलिकॉप्टरने रामनगर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन घेतले अपडेट

सीएम पुष्कर सिंह धामी यांनी अल्मोडा येथील बस दुर्घटनेबाबत आपत्ती व्यवस्थापन सचिव, आयुक्त कुमाऊं विभाग आणि डीएम अल्मोरा यांच्याशी फोनवर बोलून घटनेची माहिती घेतली आणि बचाव आणि मदत कार्य जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या. एसडीआरएफसोबतच एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+