मोदी पुन्हा रुसला जाणार; ज्या परिषदेला जाणार, ती ब्रिक्स परिषद नेमकी आहे तरी काय..?
आगामी ब्रिक्स परिषद येत्या २२ व २३ ऑक्टोबरला रुसला होत आहे. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रुसला जाणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली. रशिया या वर्षी 16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे. रशियातील कझान येथे होणाऱ्या या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी सदस्य देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हेही या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान पीएम मोदी आणि जिनपिंग यांच्यात भेट होऊ शकते.
रशियाने केलाय मोदींचा सन्मान
मोदींना रशियाचा यापूर्वीच सर्वोच्च नागरी सन्मान समजला जाणारा 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल'नेही सन्मानित करण्यात आले आहे. मोदींनी या वर्षी जुलैमध्ये रशियाला भेट दिली होती. यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांना ब्रिक्स परिषदेसाठी आमंत्रित केले होते. 22व्या भारत-रशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी जुलैमध्ये मॉस्कोला गेले होते. त्यावेळीही या दोघांत द्विपक्षीय बैठक झाली होती.

ब्रिक्स किती शक्तिशाली आहे?
ब्रिक्स ही जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली आर्थिक संघटना आहे. पाश्चात्य देश मंदीच्या गर्तेत अडकले असतानाही ब्रिक्स देशांनी वेगाने प्रगती केली. 2008-2009 मध्ये जेव्हा पाश्चात्य देश आर्थिक संकटातून जात होते. तेव्हाही ब्रिक्स देशांची अर्थव्यवस्था वेगाने वाढत होती. ब्रिक्स संघटनेच्या स्थापनेची संकल्पना 'राइजिंग इकॉनॉमी' या तत्त्वावर आधारित आहे. याचा अर्थ ज्या देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये वेगाने पुढे जाण्याची आणि पाश्चिमात्य देशांशी स्पर्धा करण्याची हिंमत आहे. पूर्वी, पाश्चात्य देश जगाच्या अर्थव्यवस्थेच्या 60% ते 80% वर नियंत्रण करत होते, आता ब्रिक्स देश हळूहळू त्यांची जागा घेत आहेत.
पाकिस्तानलाही व्हायचेय सदस्य
गेल्या वर्षी पाकिस्ताननेही ब्रिक्समध्ये सामील होण्यासाठी अर्ज केला होता. 2024 मध्ये ब्रिक्स सदस्यत्व मिळविण्यासाठी रशियाकडून मदत मिळण्याची आशाही व्यक्त केली आहे. रशियातील पाकिस्तानचे राजदूत मुहम्मद खालिद जमाली यांनी गेल्या वर्षी TASS या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, पाकिस्तानने ब्रिक्स सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे. आम्हाला आशा आहे की रशिया आम्हाला यामध्ये मदत करेल.












Click it and Unblock the Notifications