Bakrid 2025 : बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी का दिली जाते? कधी आहे हा सण, काय असते दुआ? वाचा
Bakrid 2025 date and day bakra eid ki qurbani ki dua : ईद उल फित्रनंतर मुस्लिम धर्मीयांचा प्रमुख सण म्हणजे बकरी ईद..या सणाला ईद-उल-अजहा असेही म्हणतात, पण सामान्यतः बकरी ईद म्हणून ओळखले जाते आणि तोच शब्द प्रचलित आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, सौदी अरेबियामध्ये 12 व्या महिन्याच्या झुल हिस्सा चा चंद्र 27 मे रोजी दिसला होता, म्हणून तेथे 6 जून रोजी बकरी ईद साजरी केली जाईल.

भारतात कधी साजरी केली जाणार बकरी ईद (Bakrid 2025 date and day)
सौदी अरेबियाच्या तुलनेत भारतात, बकरी ईद शनीवारी, 7 जून 2025 रोजी एका दिवसाच्या उशिराने साजरी केली जाईल. हा सण हजरत इब्राहिम (अलैहिस्सलाम) यांच्या अल्लाहप्रती असलेल्या निष्ठा आणि बलिदानाला समर्पित आहे. या दिवशी मुस्लिम बलिदान आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या प्राण्यांची कुर्बानी देतात. बलिदान देण्याची एक पद्धत देखील आहे आणि त्यापूर्वी दुआ केली वाचली जाते. याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
बकरी ईदला कुर्बानी का दिली जाते?
बोल्ड स्कायच्या वृत्तानुसार, इस्लाम धर्मात कुर्बानी म्हणजे बलिदान... याचा उद्देश अल्लाहच्या आदेशांचे पालन करणे आणि अल्लाहच्या मार्गात तुमची प्रिय वस्तू अर्पण करणे हा आहे. अल्लाहच्या आदेशानुसार, आपला मुलगा इस्माइल (अलैहिस्सालम) यांचे बलिदान देण्याचा निर्णय इब्राहीम यांनी घेतला त्या घटनेच्या स्मरणार्थ ही परंपरा हजरत इब्राहिम यांची आठवण म्हणून निभवली जाते. इब्राहीम यांची भावना पाहून अल्लाहने एक प्राणी पाठवला ज्याची कुर्बानी देण्यात आली.
'कुर्बानी'ची दुआ कशी केली जाते?
कुर्बानीपुर्वी एक विशेष नमाज पठण केली जाते. खरं तर, कुर्बानी देताना, प्राणी कत्तल करण्यापूर्वी ही नमाज पठण केली जाते - "बिस्मिल्लाही अल्लाहू अकबर, अल्लाहुम्मा मिंका व लका, अल्लाहुम्मा तक्ब्बल मिन्नी." ज्याचा मराठीत अर्थ "अल्लाहच्या नावाने, जो सर्वश्रेष्ठ आहे. हे अल्लाह! ही (कुर्बानी) तुझ्याकडून आणि तुझ्यासाठी आहे. माझ्याकडून ती स्वीकार करा." असा याचा अर्थ आहे.












Click it and Unblock the Notifications