इंस्टाग्रामवर सध्या धमाका करणारा ‘बोटवरील मुलगा' नेमका आहे तरी कोण?
सध्या सोशल मीडियावर, विशेषतः इंस्टाग्राम रील्सवर एक भन्नाट मीम जबरदस्त व्हायरल झाला आहे "Aura Farming Indonesian Boat Racing Kid" या नावाने ओळखला जाणारा लहानसा मुलगा लोकांच्या मनात कुतूहल निर्माण करत आहे. पण नेमकं काय आहे ही संकल्पना? आणि हा मुलगा कोण आहे? चला तर मग यामागची कहाणी जाणून घेऊया. खरंय की नाही या युट्यूब चॅनेलने या मुलावर व्हिडिओ करून याबाबत माहिती दिली आहे.

'ऑरा फार्मिंग' म्हणजे नेमकं काय?
'Aura' म्हणजे एखाद्या व्यक्तीचं प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आत्मविश्वास, स्टाईल, आणि आकर्षण यांचं मिश्रण. 'Aura Farming' ही एक मजेशीर संकल्पना आहे, जिथे एखादी व्यक्ती मुद्दामहून किंवा नकळतपणे अशा प्रकारे वागते की त्यातून तिचा "कूलनेस" झळकतो. ही कृती नेहमी आवश्यक नसते, पण ती लोकांचे लक्ष वेधून घेते याचं सोशल मीडियावर विनोदी रूपात सादरीकरण केलं जातं.
हा मीम कसा झाला व्हायरल?
हा व्हिडीओ इंडोनेशियातील पारंपरिक बोट शर्यतीतील आहे. अशा शर्यतींमध्ये लाकडी बोटींवर काही लहान मुले पुढच्या टोकावर उभी राहून विशिष्ट हालचाली आणि डान्स करत असतात. या मुलांना स्थानिक भाषेत "Togak Luan" म्हणतात. मूळ उद्देश नावाड्यांचा ताल राखण्यासाठी असलेली ही नृत्यशैली आता परंपरेचा भाग बनली आहे आणि आता ती 'ऑरा'चं प्रतीकही बनली आहे!
'Reaper' नावाने ओळखला जाणारा मुलगा ठरतोय स्टार
या मीममधील विशेष लक्ष वेधून घेणारा मुलगा म्हणजे 'Reaper' हे टोपणनाव मिळवलेला लहान मुलगा. त्याच्या अंगात भरलेला आत्मविश्वास, डान्स स्टाईल आणि डोक्यावर टोपी असा अंदाज हे सगळं मिळून त्याची 'ऑरा' इतकी जबरदस्त ठरली की सोशल मीडियावर तो सुपरस्टार बनला आहे.
इंडोनेशियन मुलांचं 'ऑरा फार्मिंग' भारतीय गाण्यांवर देखील धडाक्यात!
हा ट्रेंड इतका लोकप्रिय झाला आहे की लोक या बोटवरील मुलांचे डान्स व्हिडीओज 'Young, Black & Rich' या गाण्यासोबतच नव्हे तर अनेक भारतीय गाण्यांवरही एडिट करून शेअर करत आहेत. 'ओ अंटवा', 'सामी सामी', 'पुष्पा'सारखी गाणी यामध्ये अधिक ट्रेंडिंग आहेत. हे पाहून भारतीय प्रेक्षकांचा उत्साह आणखीनच वाढला आहे.
फक्त विनोद नाही, एक सांस्कृतिक दर्शन
'ऑरा फार्मिंग इंडोनेशियन बोट किड' केवळ मजेदार कंटेंटपुरता मर्यादित नाही, तर त्यामधून इंडोनेशियाची पारंपरिक जलक्रीडा आणि सांस्कृतिक शिस्तही जगापर्यंत पोहोचते. हे मीम म्हणजे जागतिक संस्कृतींचं हास्य-मनोरंजनाच्या माध्यमातून एकत्र येणं.
एक जागतिक ट्रेंडचा जन्म
या संपूर्ण ट्रेंडने हे सिद्ध केलं आहे की, इंटरनेट हे असं माध्यम आहे जिथून कोणतीही स्थानिक गोष्ट क्षणात जागतिक स्तरावर पोहोचू शकते. इंडोनेशियाच्या एका बोट शर्यतीतील दृश्य आज संपूर्ण जगभरातील लोकांच्या फोन स्क्रीनवर आणि मनात घर करत आहे.
"Aura Farming Indonesian Boat Kid" हे मीम केवळ एक सोशल ट्रेंड नसून, ती एक सांस्कृतिक आणि मनोरंजनाची रंगतदार कहाणी आहे जी इंटरनेटच्या ताकदीमुळे जगभर पोहोचली आणि प्रत्येकाने आपापल्या भाषेत, संगीतात, शैलीत अनुभवली.












Click it and Unblock the Notifications