August 2025 Important Fasts Festivals : ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण सण, उत्सवांच्या तारखा जाणून घ्या
August 2025 Important Fasts Festivals : ऑगस्ट महिना हा भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हाच महिना ज्याला मराठी कॅलेंडरनुसार, श्रावण महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात अनेक सण आणि उपवास आहेत, खास करुन श्रावण सोमवार व्रताचा भगवान शिवाचा महिना, राखीपौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्ठमी,मंगळागौरी आदी अनेक सण या महिन्यात आहेत. खाली यादी पाहून तुम्ही तुमच्या महिन्याचे नियोजन करू शकता.

- १ ऑगस्ट: मासिक दुर्गाष्टमी
- ४ ऑगस्ट: श्रावण महिन्यातील चौथा सोमवार
- ५ ऑगस्ट: मंगळा गौरी व्रत, पुत्रदा एकादशी, दामोदर द्वादशी
- ६ ऑगस्ट: बुध प्रदोष व्रत
- ८ ऑगस्ट: वरलक्ष्मी व्रत
- ९ ऑगस्ट: पुण्यतिथी व्रत
- १२ ऑगस्ट: कजरी तीज, बहुळा चतुर्थी
- १४ ऑगस्ट: बलराम जयंती
- १५ ऑगस्ट: कृष्ण जन्माष्टमी (या दिवशी रक्षाबंधन नाही)
- १६ ऑगस्ट: दहीहंडी, कालाष्टमी
- १७ ऑगस्ट: सिंह संक्रांती, सूर्य संक्रमण
- १९ ऑगस्ट: अजा एकादशी
- २२ ऑगस्ट: पिठोरी अमावस्या
- २३ ऑगस्ट: भाद्रपद अमावस्या
- २५ ऑगस्ट: वराह जयंती
- २६ ऑगस्ट: हरतालिका तीज
- २७ ऑगस्ट: गणेश चतुर्थी
- २८ ऑगस्ट: ऋषी पंचमी
- ३० ऑगस्ट: ललिता सप्तमी
- ३१ ऑगस्ट: राधा अष्टमी
रक्षाबंधन
भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण श्रावणातील पोर्णिमेला साजरा केला जातो. या वर्षी हा सण ९ ऑगस्टला आहे. या दिवशी भावाला बहिण राखी बांधते आणि त्याच्या दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा देते. तर भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो.
गोपाळकाला-दहीहंडी
गोपाळकाला दहीहंडी हा सण पुर्ण भारतात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. श्रीकृष्णांचा या दिवशी जन्म झाला होता. भाद्रपद श्रावण कृष्ण अष्टमीला भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. या वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला-दहीहंडी हा सण १५ आणि १६ ऑगस्टला आला आहे. अर्धर्मियांचा नाश करण्यासाठी या दिवशी भगवान कृष्णाने अवतार घेतला होता.
(Disclaimer : ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या श्रद्धा आणि माहितीवर आधारित आहे. वनइंडिया लेखाशी संबंधित कोणत्याही इनपुट किंवा माहितीची पुष्टी करत नाही, म्हणून कोणतीही माहिती लागू करण्यापूर्वी, कृपया एखाद्या जाणकार ज्योतिषी किंवा पंडितांचा सल्ला घ्या.)












Click it and Unblock the Notifications