Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

NEET आणि UGC-NET बाबतच्या गदारोळानंतर मध्यरात्री केंद्राचा मोठा निर्णय, पेपरलीक विरोधी कायदा लागू

Mumbai: पेपरफूटी प्रकरणामुळे सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शुक्रवारी रात्री स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनियमितता रोखण्याच्या उद्देशाने कठोर कायदा लागू केला. या कायद्यात दोषींना कमाल 10 वर्षे कारावास आणि 1 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यम प्रतिबंधक) कायदा, 2024 ला मंजूरी दिल्यानंतर सुमारे चार महिन्यांनंतर, केंद्र सरकारने शुक्रवारी रात्री एक अधिसूचना जारी केली की कायद्यातील तरतुदी 21 जूनपासून लागू होतील.

paper leak law

अत्यंत महत्त्वाचे पाऊल

UGC-NET, 2024 च्या प्रश्नपत्रिका फुटण्याच्या वादात हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यम प्रतिबंधक) कायदा, 2024 च्या कलम 1 च्या उप-कलम (2) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना, केंद्र सरकारच्या तरतुदींद्वारे उक्त कायद्याची, 21 जून 2024 पासून अंमलबजावणी केली जाईल असे अधिसूचनेमध्ये म्हटले आहे.

एक दिवस आधी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना हा कायदा कधीपासून लागू होणार असा प्रश्न विचारला असता त्यांनी कायदा मंत्रालय नियम बनवत असल्याचे सांगितले होते.

लोकसभेने ६ फेब्रुवारीला आणि राज्यसभेने ९ फेब्रुवारीला सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध) विधेयक, २०२४ मंजूर केले होते. राष्ट्रपती मुर्मू यांनी 12 फेब्रुवारी रोजी त्यास मंजुरी दिली होती.

UPSC, SSC, रेल्वे, बँकिंग भरती परीक्षा आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) इत्यादींद्वारे घेण्यात येणाऱ्या सार्वजनिक परीक्षांमध्ये अनुचित माध्यमांचा वापर रोखणे हा या कायद्याचा उद्देश आहे. फसवणूक रोखण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.

तर फसवणुकीच्या संघटित गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना पाच ते दहा वर्षांचा तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

अशा गुन्ह्यांवर कडक कारवाईचा इशारा

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी यापूर्वी सांगितले होते की, हा कायदा परीक्षार्थींना त्यातील तरतुदींपासून संरक्षण देतो. या कायद्यापूर्वी गैरप्रकार रोखण्यासाठी किंवा गुन्ह्यांना सामोरे जाण्यासाठी कोणताही विशिष्ट ठोस कायदा नव्हता. यामुळे या कायद्यामुळे आता गैरप्रकार करणाऱ्यांना जरब बसणार आहे.

गुन्हेगारांना शिक्षा होईल

नेट-यूजीसी, यूपीएससी, एसएससी, रेल्वे भरती, बँकिंग यांसारख्या परीक्षांचे पेपर लीक करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी मोदी सरकारने पेपर लीक विरोधी कायदा केला होता, ज्याला सार्वजनिक परीक्षा ( अयोग्य माध्यम प्रतिबंधक) अधिनियम 2024 असे नाव देण्यात आले होते. हा कायदा यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मंजूर करण्यात आला.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+