गुन्हेगारांची खैर नाही! इंटरपोलच्या धर्तीवर आता भारतपोल; काय आहे नेमकी कन्सेप्ट, वाचा A टू Z माहिती
भारतात गुन्हे करुन परदेशात पळून जाणाऱ्या गुन्हेगारांचे दिवस आता भरणार आहेत. अपराध करणारे आते देशात किंवा थेट परदेशात लपले तरी कायद्याच्या कचाट्यातून ते सुटू शकणार नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाने आता इंटरपोलच्या धर्तीवर भारतपोलची निर्मीती करणार आहे. भारतपोल या वेब पोर्टलच्या माध्यमातून राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस थेट इंटरपोलल यंत्रणेला जोडणार आहेत. या पोर्टलची चाचणी यशस्वी झाली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ७ जानेवारी रोजी या पोर्टलचे लोकार्पण करणार आहेत.

इंटरपोल काय आहे?
जगातील १९५ देशांच्या तपास यंत्रणांची इंटरपोल ही एक पोलीस संस्था आहे. गुन्हेगारांबद्दलची माहितीची देवाण- घेवाण करण्याचे काम ही संस्था करते. भारतातील सीबीआचे अधिकारी इंटरपोलमध्ये नेमले जातात. भारतामध्ये गुन्हेगारीची एखादी घटना घडली आणि गुन्हेगार परदेशात पळून गेला असेल तर सीबीआयच्या विनंतीवरुन इंटरपोल त्या गुन्हेगाराची माहिती देते. ही माहिती सीबीआयकडे येते आणि त्यानंतर सीबीआय ही माहिती स्थानिक पोलिसांना देते. या संपूर्ण प्रक्रियेत खूप वेळ जात होता.
भारतपोल काय करणार?
इंटरपोलकडून माहिती घेतल्यावर सीबीआय ती माहिती स्थानिक प्रशासनाला किंवा पोलिसाला देत होते. या प्रक्रियेत वेळ जात होता. आता भारतपोलच्या माध्यमातून राज्य पोलीस यंत्रणा थेट इंटरपोलशी संवाद साधू शकणार आहे. भारतपोलकडे अद्याप तरी, नोटीस बजावण्याचा अधिकार नसून तो अधिकार फक्त इंटरपोलकडे आहे. यासाठी इंटरपोलने भारतपोलची विनंती मान्य केल्यास देश सोडून गेलेल्या गुन्हेगाराविरूद्ध नोटीस बजावली जाऊ शकते. तसेच परदेशात पळालेल्या गुन्हेगाराची माहिती आता थेट स्थानिक पोलिसांना मिळू शकते.
भारतपोल काम कसे?
राज्य पोलीस एखाद्या गुन्हेगारासाठी थेट इंटरपोलकडे विनंती पाठवू शकणार आहे. इंटरपोल त्यांना सरळ त्याची माहिती देणार आहे. यापूर्वी सीबीआयमार्फत इंटरपोलकडे विनंती पाठवावी लागत होती. त्यानंतर इंटरपोलने दिलेली माहिती सीबीआय राज्य पोलिसांना देत होती. त्यात वेळ जात होता. परंतु आता राज्य पोलीस आणि इंटरपोल असा थेट संपर्क होणार असल्यामुळे तपास गतिमान होणार आहे.
भारतपोल कधी सुरु होणार?
केंद्रीय अन्वेषन ब्युरोने (सीबीआय) भारतपोल नावाचे अत्याधुनिक ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे. जे राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस व एनआयए आणि ईडी या सर्व तपास यंत्रणांना जोडलेले असणार आहे. भारतपोलची यशस्वी चाचणी झाला असून येत्या ७ जानेवारीला भारत मंडपम येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या पोर्टलचे लोकार्पण करतील.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन!










Click it and Unblock the Notifications