अंबुजा आणि एसीसीला SBTi कडून नेट झिरो मान्यता मिळवणाऱ्या भारतातील पहिल्या सिमेंट कंपन्यांचा गौरव
अडाणी समूहाच्या विविध औद्योगिक व्यवसायांपैकी असलेल्या अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी या सिमेंट व बांधकाम साहित्य क्षेत्रातील कंपन्यांनी एक ऐतिहासिक शाश्वततेची कामगिरी गाठली आहे. भारतातील समकक्ष सिमेंट कंपन्यांमध्ये त्या प्रथम आहेत ज्यांच्या नेट झिरो लक्ष्यांना Science Based Targets initiative (SBTi) कडून मान्यता मिळाली आहे.

SBTi चे कॉर्पोरेट नेट-झिरो स्टँडर्ड हे हवामान विज्ञानाशी सुसंगत असलेले कॉर्पोरेट नेट-झिरो लक्ष्य निश्चित करण्यासाठीचे जगातील एकमेव फ्रेमवर्क आहे. ही मान्यता मिळाल्यामुळे कंपन्यांचा शाश्वत व जबाबदार व्यवसाय उभारण्याचा कटिबद्ध प्रयत्न अधोरेखित होतो. जिथे त्यांनी सोप्पं नव्हे, तर गरजेचं निवडलं आहे.
त्यामुळे त्या भारताच्या औद्योगिक डीकार्बोनायझेशनमध्ये अग्रणी ठरल्या आहेत आणि पॅरिस कराराच्या 1.5°C लक्ष्याशी सुसंगत अशा गतीने आणि प्रमाणात उत्सर्जन कपात करण्यासाठी वचनबद्ध आहेत.
अडाणी समूहाच्या सिमेंट व्यवसायाचे सीईओ विनोद बहेती यांनी सांगितले, "अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी या दोन्ही कंपन्यांच्या शाश्वततेविषयीच्या पायोनियर परंपरेचा आम्हाला अभिमान आहे. हवामान संकटाच्या पार्श्वभूमीवर कृती करणे ही आमची जबाबदारी आहे. SBTi ही कॉर्पोरेट हवामान उद्दिष्टांसाठीची सर्वोच्च मान्यता आहे.
या मान्यतेमुळे आम्ही पर्यावरण जपणाऱ्या आणि विकासाला गती देणाऱ्या भविष्यासाठी कटिबद्ध असल्याचे अधोरेखित होते. आम्ही जगातील नवव्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक आहोत आणि Cemex, Heidelberg आणि Holcim यांच्यानंतर अशा प्रमाणात SBTi मान्यता मिळवणारे मोजकेच आहोत. आमचा प्रवास इथे थांबत नाही हे फक्त एक पाऊल आहे, आपल्या डिकार्बोनाइज्ड आणि शाश्वत जगाच्या दृष्टिकोनाकडे."
या कंपन्यांना वेगाने आणि प्रभावीपणे उत्सर्जन कपात करण्याचे महत्त्व समजले आहे आणि त्या उद्योगाच्या शाश्वत परिवर्तनाचे नेतृत्व करत आहेत. SBTi च्या निकषांनुसार कंपन्या थेट उत्सर्जन कपात करण्यावर लक्ष केंद्रित करतील आणि उरलेल्या उत्सर्जनाचे संतुलन साधतील. ग्रीन पॉवर, AFR (अल्टरनेटिव्ह फ्युएल अँड रॉ मटेरियल), ऊर्जा कार्यक्षमता, तंत्रज्ञान उन्नती आणि नवोपक्रम या क्षेत्रातील उपक्रमांमुळे या लक्ष्यांची प्राप्ती शक्य झाली आहे.
अंबुजा सिमेंट्स ही जागतिक स्तरावर 'Alliance for Industry Decarbonization (AFID)' या आंतरराष्ट्रीय नूतनीकरणीय ऊर्जा संस्था (IRENA) नेतृत्वाखालील उपक्रमात सामील होणारी पहिली सिमेंट कंपनी ठरली आहे. तसेच, ती WEF (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) च्या 'Transitioning Industrial Clusters' या पुढाकाराची सदस्यही आहे. अडाणी समूहाच्या संपूर्ण इकोसिस्टीममधील समन्वय या उद्दिष्टांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
अडाणी समूहाने भारताच्या हरित ऊर्जा संक्रमणासाठी 100 अब्ज डॉलर्सची (USD 100 Billion) गुंतवणूक जाहीर केली असून, 2030 पर्यंत नूतनीकरणीय ऊर्जा क्षमता 14.2 GW वरून 50 GW पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. याच योजनेखाली अंबुजा सिमेंट्सने वित्तीय वर्ष 2028 पर्यंत आपल्या एकूण वीज गरजांपैकी 60% ऊर्जा हरित स्रोतांतून मिळवण्याचा मानस व्यक्त केला आहे.
यामध्ये 1 GW सौर व वाऱ्याद्वारे निर्मिती तसेच 376 MW WHRS (Waste Heat Recovery Systems) चा समावेश आहे. यापैकी 299 MW व 186 MW इतकी क्षमता आधीच प्रस्थापित झाली आहे.
याशिवाय, ग्रीन हायड्रोजन हे नेट-झिरो साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. समूहातील गुंतवणूक आणि सामायिक कौशल्याच्या मदतीने अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी हे आपल्या डीकार्बोनायझेशनच्या वाटचालीत अधिक गती घेऊन इंधनांवरील अवलंबित्व कमी करू शकतील.
ही SBTi मान्यता केवळ एक टप्पा नाही, तर एक जबाबदारी आहे. अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी या दोन्ही कंपन्या सिमेंट उद्योगासाठी नव्या मानकांची उभारणी करत आहेत, हे सिद्ध करत आहेत की धाडसी हवामान कृती शक्य आहे, आवश्यक आहे आणि ती सुरूही झाली आहे.












Click it and Unblock the Notifications