Earthquake Bihar : दिल्लीपाठोपाठ बिहारच्या सिवानमध्येही तीव्र भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये दहशत

Earthquake in Delhi-NCR And Bihar : देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी (दि.17) पहाटेच भूकंपाचे धक्के बसले. तशीच प्रचिती व भूकंपाचे धक्के बिहारमधील सिवानमध्ये बसले आहेत. दिल्लीच्या तीव्रते इतकाच म्हणजेच 4.0 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद बिहारमध्येही झाली आहे.

भूकंपामुळे सिवानमधील लोक घाबरले होते. लोक घराबाहेर पडले आणि मोकळ्या जागेत पळून गेले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने म्हटले आहे की भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 पेक्षा जास्त नोंद झालेली आहे.

earthquake tremors also hit Bihar s Siwan

काय म्हणाले स्थानिक लोक?

भूकंपाचे धक्के जाणवणाऱ्या सिवानमधील लोकांनी सांगितले की, त्यांना जमीन खूप जोरात हादरत असल्याचे जाणवले. लोकांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सावध करायला सुरुवात केली आणि त्यांच्या मुलांना मांडीवर किंवा खांद्यावर घेऊन बाहेर पळायला सुरुवात केली. भूकंपानंतरच्या धक्क्यांच्या भीतीमुळे बरेच लोक बराच वेळ त्यांच्या घराबाहेर दिसले. तर अनेक गावात अशीच भयावह परिस्थिती निर्माण झाली होती.

सोमवारी सकाळीच जमीन हादरू लागली

सोमवारी सकाळीच दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. राजधानीची जमीन काही सेकंदांपर्यंत हादरत राहिली. लोक घाबरून घराबाहेर पडले. दिल्लीतील भूकंपाची तीव्रता देखील 4.0 इतकी मोजण्यात आली. त्याचे केंद्र दिल्लीजवळ, पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली 5 किलोमीटर खोलीवर होते.

हे ही वाचा : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, लोक घराबाहेर पळाले, रिश्टर स्केलवर 4.3 इतकी नोंद

पंतप्रधानांनी केले ट्विटद्वारे आवाहन

दिल्ली भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आणि म्हटले की, 'दिल्ली आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. आम्ही सर्वांना शांत राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आवाहन करतो. अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+