अदानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'आयएसएसओ राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन
अदानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयएसएसओ- राष्ट्रीय 'बुद्धिबळ स्पर्धा राष्ट्रीय खेळांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत भारतातील ८० हून अधिक शाळांमधील ३७० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, अनेक आघाडीच्या बुद्धीबळपटूंनी आपले कसब यावेळी पणाला लावले.
Adani international school iss national games chess Championship 2025 : शांतीग्राम येथील अदानी इंटरनॅशनल स्कूलने आयएसएसओ नॅशनल गेम्स बुद्धिबळ स्पर्धा २०२५ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ६५ घरांच्या पटावर बुद्धिमत्ता आणि क्रीडा कौशल्याचा उत्सव दोन दिवस शानदार पद्धतीने साजरा झाला. या स्पर्धेत भारतातील १० पेक्षा जास्त राज्यांमधील ८० हून अधिक शाळांचे प्रतिनिधित्व करणारे ३७० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. पालक, प्रशिक्षक आणि समर्थकांसह ६५० हून अधिक उपस्थितांसह, कॅम्पस स्पर्धा आणि सौहार्द मैत्रीचे एक चैतन्यशील केंद्र बनले होते.

बुद्धीबळ स्पर्धेत ११ वर्षांखालील, १४ वर्षांखालील, १७ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील गट होते. यामुळे खेळाडूंना त्यांच्या बुद्धिबळ प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर आपापल्या गटात तुल्यबल स्पर्धकांशी भिडण्याची संधी मिळाली. दोन तीव्र दिवसांमध्ये, खेळाडूंनी आपल्या अचाट बुद्धीमत्तेचे दर्शन घडवत तीव्र रणनीती, कौशल्य आणि दबावाखालीही संयम दाखवला.
उद्घाटन समारंभाला अदानी इंटरनॅशनल स्कूलच्या प्रवर्तक नम्रता अदानी या उपस्थित होत्या, त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संवादाने स्पर्धकांना चांगली उभारी आणि प्रेरणा मिळाली. तरुण खेळाडूंना गुजरात राज्य बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे उपाध्यक्ष भावेश पटेल आणि ग्रँडमास्टर अंकित राजपारा यांनी देखील मार्गदर्शन यावेळी केले.
भारतीय बुद्धिबळपटूंचा जागतिक पटलावर दबदबा आहे. याचा केंद्रबिंदू आर. प्रज्ञानंद, डी. गुकेश आणि इतर प्रतिभावंत खेळाडू आहेत ते जगातील सर्वोत्तम खेळाडूंना आव्हान देत आहे आणि भारताला शीर्ष बुद्धिबळ राष्ट्रांमध्ये एक मजबूत स्थान मिळवून देत आहे. आंतरराष्ट्रीय यशाची ही लाट देशातील भरभराटीच्या शालेय-स्तरीय परिसंस्थेत रुजलेली आहे. जिथे अदानी इंटरनॅशनल स्कूलमधील अशा स्पर्धा तरुण खेळाडूंना उच्च-स्तरीय स्पर्धेसाठी लवकर प्लॅटफार्म मिळवून देतात. अशा प्लॅटफॉर्मद्वारे प्रतिभावंत खेळाडूंच्या कलागुणांचे संगोपन होत असून जगातील बुद्धीबळाच्या मानाच्या बड्या स्पर्धेसाठी हे खेळाडू तयार होत आहेत. यामुळे देशभरातली शाळा आणि कॅम्पसमधून विजेत्यांची पुढील पिढी उदयास येईल याची खात्री होते.
या कार्यक्रमाने अदानी इंटरनॅशनल स्कूलची समग्र शिक्षणाप्रती असलेली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली, येथे क्रीडा उत्कृष्टता बौद्धिक विकासाला पूरक आहे. समर्पित क्लब, तज्ज्ञ प्रशिक्षण आणि नियमित स्पर्धांद्वारे समर्थित शाळेची समृद्ध क्रीडा संस्कृती, समीक्षात्मक विचारसरणी, लवचिकता येथे असून नैतिक वर्तनाचे धडेही येथे मिळत आहेत.
समारोपाच्या समारंभात, चारही श्रेणींमध्ये पदके प्रदान करण्यात आली, एकूण विजेता आणि उपविजेत्या संघाची घोषणा करण्यात आली. मुंबईतील चत्रभुज नरसी शाळेला एकूण स्पर्धेचे विजेतेपद तर हैदराबाद येथील इंडस इंटरनॅशनल स्कूलला उपविजेतेपद मिळाले. या दोन्ही शाळांनी सातत्य, लक्ष केंद्रित आणि उत्कृष्ट क्रीडा कौशल्य दाखवले.
अंडर-11 ते अंडर-19 वयोगटातील शालेय रँकिंग: मुला-मुलींच्या शाळांची यादी
येथे अंडर-11 ते अंडर-19 या वयोगटातील मुला-मुलींच्या शाळांची रँकिंग दिली आहे, ज्यामध्ये विविध आंतरराष्ट्रीय आणि नामांकित शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
UNDER 11 रँक
(रँक) (मुलांचे नाव) (मुलांची शाळा) (मुलींचे नावं) (मुलींची शाळा)
- 1 अयानराज कोट्टापल्ली- श्रीनिधी इंटरनॅशनल स्कूल, अमाया अग्रवाल - इंडस इंटरनॅशनल स्कूल हैदराबाद
- 2 अनाय अग्रवाल इंडस- इंटरनॅशनल स्कूल हैदराबाद, तीशा ब्याडवाल - जयश्री पेरीवाल ग्लोबल स्कूल
- 3 अहान कटारुका - नीता मुकेश अंबानी ज्युनियर स्कूल, मृण्मयी डावरे - एचव्हीबी ग्लोबल अकॅडमी
UNDER 14 रँक
(रँक) (मुलांचे नाव) (मुलांची शाळा) (मुलींचे नावं) (मुलींची शाळा)
- 1 निर्वाण नीरव शाह - डॉन बॉस्को इंटरनॅशनल स्कूल, नैषा खंडेलवाल - नीरज मोदी स्कूल
- 2 अमाय जैन - रॉकवूड्स इंटरनॅशनल स्कूल, आद्या रेड्डी - कोंडा द गॉडीयम स्कूल
- 3 उद्भव शर्मा - नीरज मोदी स्कूल, श्रेया तीर्थानी - भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्स
UNDER 17 रँक
(रँक) (मुलांचे नाव) (मुलांची शाळा) (मुलींचे नावं) (मुलींची शाळा)
- 1 अमन जॉर्ज - थॉमस विद्याशिल्प अकॅडमी, हसिथा रेड्डी पटेलू- मँचेस्टर ग्लोबल स्कूल
- 2 आदित्य कुणाल पाटील- धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, अनन्या खंडेलवाल- जेबीसीएन इंटरनॅशनल स्कूल, परळ
- 3 देवान्श खंडेलवाल - स्कॉटिश हाय इंटरनॅशनल स्कूल, सुहानी लोहिया -धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल
UNDER 19 रँक
(रँक) (मुलांचे नाव) (मुलांची शाळा) (मुलींचे नावं) (मुलींची शाळा)
- 1 स्पर्श सरावगी - इंडस इंटरनॅशनल स्कूल बेंगळुरू, झलक ब्याडवाल -जयश्री पेरीवाल ग्लोबल स्कूल
- 2 आयन सिंघवी - जयश्री पेरीवाल इंटरनॅशनल स्कूल, ध्याना दोशी - आदित्य बिर्ला वर्ल्ड अकॅडमी
- 3 कबीर टंडन -इंडस इंटरनॅशनल स्कूल बेंगळुरू, निभा मंचल -संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल












Click it and Unblock the Notifications