Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 'छप्परफाड' वाढ? 8 व्या वेतन आयोगाबाबत 'या' 10 लेटेस्ट अपडेट्स वाचा

8th Pay Commission 10 latest Updates : देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी 'टर्म्स ऑफ रेफरन्स' (ToR) ला हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. 1 जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या या नवीन वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन म्हणजेच बेसिक पे, महागाई भत्ता म्हणजेच डिए आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, यात पेन्शनधारकांना आयोगाच्या कक्षेतून वगळल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

8th Pay Commission 10 latest Updates

'फिटमेंट फॅक्टर' म्हणजे काय?

'फिटमेंट फॅक्टर' म्हणजे कर्मचाऱ्यांचे जुने मूळ वेतन घेऊन त्याला ज्या संख्येने (फॅक्टरने) गुणले जाते, त्यातून त्याचे नवीन मूळ वेतन निर्धारित होते, त्याला 'फिटमेंट फॅक्टर' म्हणतात.

उदाहरणार्थ..जर एखाद्या कर्मचाऱ्याचे जुने मूळ वेतन ₹18,000 असेल, तर नवीन मूळ वेतन (Basic Pay) असे निश्चित होते.

  • नवीन मूळ वेतन=जुने मूळ वेतन×फिटमेंट फॅक्टर
  • नवीन मूळ वेतन=₹18,000×2.57=₹46,260
  • याचा अर्थ, फिटमेंट फॅक्टरमुळे मूळ वेतनात 2.57 पट वाढ झाली.

उद्देश: याचा मुख्य उद्देश हा आहे की, नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एकसमान आणि भरीव वाढ व्हावी, जेणेकरून मागील आयोगापेक्षा त्यांचे वेतन अधिक आकर्षक आणि महागाईनुसार समायोजित होईल.

8 व्या वेतन आयोगाशी संबंधित 10 महत्त्वपूर्ण गोष्टी

प्रत्येक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाला माहिती असायला हव्यात अशा 8 व्या वेतन आयोगाशी संबंधित 10 मोठ्या घडामोडी आणि शक्यता आहे.

1. प्रक्रियेला सुरुवात: आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे.

2. लागू होण्याची तारीख: नवीन वेतन आणि पेन्शन दर 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने (Retrospectively) लागू होण्याची शक्यता आहे.

3. आयोगाचे नेतृत्व: सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्ती जस्टिस रंजना प्रकाश देसाई यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच प्रोफेसर पुलक घोष आणि पंकज जैन हे सदस्य म्हणून काम करतील.

4. रिपोर्टची वेळ: ही समिती पुढील 18 महिन्यांत आपला अहवाल केंद्र सरकारकडे सुपूर्द करेल.

5. पगारवाढीचा अंदाज: सरकारी आकडेवारी नसली तरी, मागील ट्रेंडनुसार वेतन आणि पेन्शनमध्ये 30% ते 34% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

6. फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ: 7 व्या वेतन आयोगात 2.57 असलेला फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) 2.86 किंवा त्याहून अधिक होण्याची अपेक्षा आहे. (उदा. यामुळे 25,000 रुपये मूळ वेतन सुमारे 71,500 रुपये पर्यंत वाढू शकते.)

7. DA/DR मध्ये वाढ: मूळ वेतनात वाढ झाल्यामुळे महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR) मध्ये आपोआप वाढ होईल, ज्यामुळे पेन्शनधारकांनाही मोठा दिलासा मिळेल.

8. पेन्शनर्सची नाराजी: ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन (AIDEF) ने सुमारे 69 लाख पेन्शनर्स आणि कौटुंबिक पेन्शनर्सना आयोगाच्या 'टर्म्स ऑफ रेफरन्स' (ToR) मधून वगळल्यामुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

9. पेन्शनर्सच्या मागण्या: नॅशनल पेन्शन स्कीम एम्प्लॉईज फेडरेशनने वैद्यकीय भत्त्यात (Medical Allowance) वाढ (3,000 रुपयांवरून 20,000 रुपये) आणि 40% पेन्शन कम्युटेशनची मुदत 15 वर्षांवरून 12 वर्षे करण्याची मागणी केली आहे.

10. राज्य कर्मचाऱ्यांवर परिणाम: केंद्र सरकारच्या शिफारसींचा प्रभाव सामान्यत: राज्य सरकारांच्या वेतन आयोगावरही पडत असल्याने, राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही या बदलाचा फायदा होण्याची शक्यता आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+