Labour Day 2025 : कामगार दिनानिमित्त आपल्या मित्र परिवार, नातेवाईकांना द्या खास मराठीत हटके शुभेच्छा
Labour Day 2025 : संपूर्ण राज्यात 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. 1960 साली महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन झाल्याचा हा दिवस आहे. 1 मे रोजी जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन एकत्र साजरे होणार आहेत. हा दिवस जगभरात कामगारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या समान हक्कांसाठी लढण्याचा प्रतीक आहे. महाराष्ट्रात हा दिवस महाराष्ट्र दिनासह साजरा होत असल्याने यंदा उत्साह दुप्पट आहे.
जागतिक कामगार दिनाची सुरुवात 1886 मध्ये अमेरिकेत झाली. त्यावेळी कामगारांनी 8 तासांच्या कामाच्या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनाला 'हेयमार्केट प्रकरण' म्हणून ओळखले जाते. यामध्ये अनेक कामगारांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या बलिदानामुळे 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून घोषित करण्यात आला. भारतातही हा दिवस 1923 पासून साजरा होतो. अनेक ठिकाणी सुट्टी जाहीर केली जाते. कामगार दिन हा केवळ सुट्टीचा दिवस नाही तर कामगारांच्या हक्कांसाठी जागरूकता निर्माण करण्याचा आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा एक प्रसंग आहे.
महाराष्ट्रात 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिनासह साजरा होतो. कारण 1960 मध्ये याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या दोन्ही दिवसांचा अनोखा संगम महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण निर्माण करतो. कामगार दिनाच्या निमित्ताने कामगार संघटना आणि सामाजिक संस्था विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात.
कामगार दिनाच्या निमित्ताने कामगार संघटना आणि सामाजिक संस्था विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात, ज्यामध्ये रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कामगारांच्या समस्यांवर चर्चा सत्रांचा समावेश असतो. या खास दिवशी एकमेकांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. या वर्षीच्या कामगार दिनाला तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र, नातेवाईकांना खास मराठी हटके स्टाईलमध्ये मराठीमध्ये कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
कामगार दिनानिमित्त मराठी हटके शुभेच्छा

एकजुटीने काम करू कामावरती प्रेम करू
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

काम करा हो काम करा कामावरती प्रेम करा....
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...!

कष्टाची भाकर मिळते कामातून
काम करा आणि मोठे व्हा...
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शेतकरी ते कष्टकरी प्रत्येकाला
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवस हक्काचा... दिवस कामगारांचा...
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

काम असे करा की लोकांनी
म्हणायला हवं काम करावं तर यानेच...
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व कामगार बंधू आणि भगिनींना
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कडाक्याच ऊन असो वा सोसाट्याचा वारा
किंवा बरसोत असो
पावसाच्या ओल्याचिंब धारा
तरी राबतो आपला कामगार अन सर्जा राजा
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांच्या कठोर परिश्रमामुळे
आणि ज्यांच्या समर्पणामुळे
देश घडविण्यात मदत झाली
अशा सर्व कामगार बंधू आणि बघिनिंना
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व कष्टकरी आणि
श्रमिक बांधवांना
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

एकजुटीने काम करू
कामावरती प्रेम करू
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

देशाच्या जडणघडणीत मोलाचे
योगदान देणाऱ्या माझ्या सर्व
श्रमिक बांधवांना...
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कष्ट करून जगणाऱ्यांची
थट्टा करू नका
हीच कामगार दिनाची अपेक्षा
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कामगाराच्या घामाला मिळो योग्य तो दाम
त्यांच्या हाताला मिळो काम
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जगाचा पोशिंदा, अतोनात कष्ट करतो
बाप माझा शेतकरी, कुटूंबाचे पोट भरतो
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कोणतेही काम शुल्लक नसते
आपल्या कामाला महत्व द्या
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

कामगार हा देशाचा अद्शय कणा आहे
त्यांच्यामुळेच देश मजबूत दिसून येतो
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...!

जो मेहनतीने त्रासाला दूर करतो,
रक्त आणि घाम गाळण्यासाठी जो मजबूर असतो,
तो प्रत्येक जण 'मजदूर' असतो...
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रमाला लाभावा मोल सर्वदा
अन् घामाला मिळावा योग्य तो दाम
कामगारांच्या हाताला मिळो काम
अणि कामाला मिळो नेहमी सन्मान
कामगार दिनाच्या आपणास खुप खुप शुभेच्छा!

आपले आवडते काम करा
आणि कामाचा आनंद घ्या
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

मी मानतो तो कामात आहे
नाही कुठे तो घामात आहे
शोधात जो तो उगाच त्याच्या
तो राबणार या घामात आहे
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आता उठवू सारे रान
आता पेटवू सारे रान
शेतक-यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण
कामगार दिनाच्या शुभेच्छा...!

उत्तम काम करण्याचा एकमेव मार्ग
म्हणजे तुम्ही जे करता त्यावर प्रेम करणे
कामगार दिनाच्या शुभेच्छा...!












Click it and Unblock the Notifications