सावधान..! भारतात वेगाने पसरतोय झिका व्हायरस, शरीरावर काय होतो परिणाम?
डासांपासून पसरणारा झिका विषाणू हा सध्या भारतात आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. झिका विषाणू हा एक 'फ्लेविव्हायरस' असून मुख्यतः संक्रमित एडीस डास चावल्याने याचा संसर्ग होतो.
विशेषतः एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस हे डास दिवसा सक्रिय असतात. त्यामुळे मानवांमध्ये संसर्गाचा धोका वाढतो. आता भारतातही हा विषाणूचा फैलाव डोकेदुखी ठरत आहे.

देशात या विषाणुची प्रकरणे वाढत असताना, या लेखात आपण विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर नेमके काय होते आणि संसर्गबाधित व्यक्तीच्या अवयवांवर काय परिणाम होतात ते पाहू.
मुळातः विशेषतः एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस डासांच्या चावण्याव्यतिरिक्त, झिका विषाणू लैंगिक संपर्काद्वारे, रक्त संक्रमणाद्वारे आणि गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मादरम्यान आईकडून बाळाला प्रसारित केला जाऊ शकतो. त्यामुळे गर्भवतींनाही या विषाणूता मोठा धोका आहे.
तसेच गर्भवती महिलांमध्ये, झिका विषाणूचा संसर्ग झाल्यास त्यांच्या बाळासाठी हा धोका ठरू शकतो. संभाव्यत: बाळात जन्मदोष आणि विकासात्मक समस्या निर्माण होतात.
झिका व्हायरसचा संसर्ग: विषाणू शरीरात कसा होतो प्रवेश?
झिका विषाणू सामान्यत: संक्रमित एडिस डासाच्या चाव्याव्दारे मानवी शरीरात प्रवेश करतो, रक्तप्रवाहात शिरकाव केल्यानंतर तो तिथे वाढू लागतो. त्यानंतर झिका विषाणू रोगप्रतिकारक आणि प्लेसेंटल पेशींसह विविध पेशींना लक्ष्य करतो आणि झिका विषाणू कणांमध्ये झपाट्याने वाढ होते.
यानंतर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली झिका विषाणूचा शोध घेते, संसर्गाशी लढण्यासाठी सज्ज होत हल्ला सुरू करते. रोगप्रतिकारक पेशी विषाणूला निष्प्रभावी करण्यासाठी आणि शरीरातून काढून टाकण्याचा प्रयत करतात,पण संसर्ग जर जास्त असल्यास कधीकधी रोगप्रतिकारक प्रणालीला भेदतो त्यामुळे हा विषाणू शरीरात दीर्घकाळ संसर्ग राहतो.
झिका व्हायरसचा अवयवांवर काय होतो परिणाम
झिका विषाणू, प्रामुख्याने डासांच्या चाव्याव्दारे पसरतो, आपल्या आरोग्यावर हानिकारक परिणाम करतो.एकदा शरीरात आल्यानंतर,हा विषाणू अनेक अवयवांवर आक्रमण करू शकतो. त्यामुळे गंभीर आणि कधीकधी जीवघेणा समस्या उद्भवतात. झिका विषाणू कोणत्या अवयवांवर परिणाम करतो हे जाणून घेणे महत्वाचे असून प्रभावी प्रतिबंध आणि उपचार महत्त्वाचे आहेत.
मेंदूवर परिणाम
झिका विषाणूचा सर्वात चिंताजनक प्रभाव म्हणजे त्याचा मेंदूवर परिणाम होतो. विशेषत: गर्भातील भ्रूणांवर जास्त होतो. जेव्हा गर्भवती महिलांना विषाणूचा संसर्ग होतो, तेव्हा त्यांच्या बाळांना मायक्रोसेफली होण्याचा धोका असतो, या स्थितीत बाळाचे डोके सामान्य आकारापेक्षा लहान होते. त्यामुळे मेंदूचे नुकसान होण्याची शक्यता असते.
झिका विषाणू प्लेसेंटा ओलांडू शकतो आणि बाळाच्या विकसनशील मेंदूवर परिणाम करू शकतो. त्यामुळे भ्रूणाच्या वाढीत मोठ्या विकासात्मक समस्या उद्भवू शकतात.
डोळे
झिका व्हायरस फक्त मेंदूलाच लक्ष्य करतो असे नाही तर ते डोळ्यांनाही हानी पोहोचवू शकतात. यामुळे जी डोळ्याच्या आत जळजळ, वेदना, लालसरपणा आणि दृष्टीची समस्या उद्भवू शकते. ही स्थिती संक्रमित लोकांच्या सामान्य जीवनावर गंभीर परिणाम करू शकते.
हृदय
झिका विषाणूमुळे हृदयावरही परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे मायोकार्डिटिस, हृदयाच्या स्नायूची जळजळ होऊ शकते. या स्थितीमुळे हृदय कमकुवत होऊ शकते, छातीत दुखणे, थकवा आणि श्वासोच्छवासाचा त्रास होण्याची शक्यता असते. गंभीर प्रकरणांमध्ये, हृदयाचे कार्य असंतुलीतही होऊ शकते.
यकृत
झिका विषाणू यकृतालाही हानी पोहोचवू शकतो. तज्ज्ञांच्या मते काही प्रकरणात असे दिसून आले आहे की यामुळे कावीळ होऊ शकतो. यकृताशी संबंधित नेमक्या कारणांवर अद्याप संशोधन सुरू असले तरी झिका विषाणूच्या रुग्णांमध्ये यकृताच्या समस्या शरीरावर या आजाराचे दूरगामी परिणाम दर्शवतात.
मूत्रपिंड (किडनी)
झिका विषाणू मूत्रपिंडांना देखील नुकसान पोहोचवू शकतो. काही अभ्यासांनी असे सांगितले की, हा विषाणू मूत्रपिंडाचे कार्य बिघडू शकतो, यामुळे मूत्रपिंडांना रक्तातील दूषित घटक फिल्टर करणे कठीण होते. हे झिका विषाणूमुळे शरीरात होणारे व्यापक नुकसान अधोरेखित होते.
झिका व्हायरस संसर्गाची ही आहेत लक्षणे
1.अंगदुखीसह ताप
2. त्वचेवर पुरळ
3. सांधेदुखी
4.लाल डोळे












Click it and Unblock the Notifications