Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

स्टॅमिना वाढवण्याच्या गोळ्या खाऊन लॉजवर गेला, मुलीशी शारिरिक संबंधावेळी बेशुद्ध अन् तरुणाचा मृत्यू!

Young man dies after having sexual intercourse with girl : शारीरिक संबंधावेळी मृत्यू झाल्याच्या अनेक घटना कानावर आल्या असतील, अनेक बातम्याही वाचल्या असतील. अशीच एक घटना नुकतीच मुंबईत घडली पण यावेळी ज्याचा मृत्यू झाला त्या व्यक्तीने स्टॅमिना वाढवण्याच्या गोळ्या खाल्ल्या होत्या त्यामुळे आता या घटनेची मोठी चर्चा होत आहे..तर स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्या आरोग्याला धोकादायक आहेत का असेल तर किती धोकादायक आहे याच्यावरही खल होत आहे.

मुंबईत एका अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध करताना ही घटना घडली आहे. मुंबईच्या डी. बी. मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. संजयकुमार तिवारी (वय 41) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

एका अल्पवयीन मुलीसोबत शारिरीक संबध करताना व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आले आहे. यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त दिले आहे. त्यानुसार,शारिरीक संबध ठेवण्याआधी संजय तिवारी याने काही गोळ्यांचे प्राशन केल्याचे तपासात समोर आले आहे. मुलीसोबत शरीरसंबंध ठेवत असताना संजय तिवारी बेशुद्ध पडले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला.

Young man dies after having sexual intercourse with girl

पोलिसांत नोंद झालेल्या माहितीनुसार, ही घटना 2 ऑक्टोंबर रोजी घडली होती, आता या घटनेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन पीडित मुलीला मुंबईत फिरण्याच्या नावाखाली आणून संजय तिवारी हे ग्रँटरोड येथील एका हॉटेलमध्ये गेले होते. त्या ठिकाणी मुलीचे वय कमी असल्याने बनावट आधारकार्ड देत दोघांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. मुलीसोबत शरिरसंबध ठेवण्यापूर्वी संजय तिवारी यांनी गोळ्यांचे सेवन केले होते.

..अन् अचानक बेशुद्ध नंतर मृत्यू!

अल्पवयीन मुलीशी शारिरिक संबधावेळी संजय तिवारी बेशुद्ध पडले, त्यानंतर मुलीने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना बोलवले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना बोलवले. पोलिसांनी संजय तिवारी यांना जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या मृत्यू कशाने झाला यासंदर्भात तपास लावला जात होता.

मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी आणि कृती करण्यापूर्वी त्याने कोणती टॅब्लेट घेतली होती की नाही, हे जाणून घेतले जात आहे. या संदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे. दरम्यान, दरम्यान पोलिसांनी मृत आरोपी संजय विरोधात अल्पवयीन मुलीवर अत्यचार केल्याच्या आरोपाखाली पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

असा झाला होता अल्पवयीन मुलीशी संपर्क

पीडित मुलीच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यावेळी संजय तिवारी यांनी या मुलीला मदत केली होती, त्यातून ती मुलगी आणि संजय तिवारी यांचा संपर्क वाढला आणि या ओळखीचा गैरफायदा घेत तिवारी यांनी तिच्यासोबत हे कृत्य केले, यादरम्यान त्यांच्यासोबत हा प्रकार घडला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+