Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

World Malaria Day 2025: जागतिक मलेरिया दिन का साजरा केला जातो, जाणून घ्या संबंधित गोष्टी आणि महत्व

World Malaria Day 2025 : दरवर्षी जगभरात जागतिक मलेरिया दिन 25 एप्रिल रोजी साजरा केला जातो. मलेरिया आजराबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी या दिवशी अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. ज्याचा उद्देश लोकांना या गंभीर आजाराबद्दल जागरूक करणे आणि त्याच्या प्रतिबंधासाठी प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आहे.

मलेरिया हा एक प्राणघातक संसर्ग आहे जो प्रामुख्याने मादी अ‍ॅनोफिलीस डासाच्या चाव्याव्दारे पसरतो. हा आजार दरवर्षी लाखो लोकांना प्रभावित करतो, ज्यामध्ये लहान मुले आणि गर्भवती महिलांना सर्वाधिक धोका असतो.

World Malaria Day 2025

मलेरिया हा डासांमुळे पसरणारा एक गंभीर आजार आहे, जो वेळीच उपचार न झाल्यास जीवघेणा ठरू शकतो. भारतात मलेरियाचा प्रसार अद्यापही चिंतेचा विषय आहे. या आजाराबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. या बातमीत मलेरिया दिनाचे महत्त्व, त्याची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि काही महत्त्वाच्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया.

जागतिक मलेरिया दिन: इतिहास आणि उद्देश

जागतिक मलेरिया दिन दरवर्षी 25 एप्रिल रोजी साजरा केला जातो. 2001 मध्ये हा दिवस आफ्रिका मलेरिया दिन म्हणून साजरा करण्यात आला. WHO ने याला जागतिक मलेरिया दिन असे नाव दिले. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2007 मध्ये हा दिवस सुरू केला, ज्याचा मुख्य उद्देश मलेरियाच्या जागतिक समस्येकडे लक्ष वेधणे आणि त्याच्या प्रतिबंधासाठी आणि नियंत्रणासाठी उपाययोजना करणे हा आहे.

मलेरिया हा आजार प्रामुख्याने उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय भागात आढळतो, जिथे डासांचा प्रादुर्भाव जास्त असतो. ज्यामुळे या आजाराविरुद्ध लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे. या दिवसाद्वारे लोकांना मलेरियाची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत जागरूक केले जाते, जेणेकरून हा आजार पूर्णपणे नाहीसा होईल.

जागतिक मलेरिया दिनाची थीम

2025 मध्ये जागतिक मलेरिया दिनाची थीम "मलेरिया आपल्यासोबत संपतो: पुनर्गुंतवणूक, पुनर्कल्पना, पुनरुज्जीवन" आहे. मलेरियाविरुद्धच्या लढाईसाठी आता नव्याने वचनबद्धता, नावीन्य आणि सहकार्याची आवश्यकता आहे हे या थीमवरून दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेली ही थीम केवळ सरकार आणि संघटनांना प्रेरणा देत नाही तर सामान्य लोकांनाही या मोहिमेचा भाग होण्यासाठी प्रोत्साहित करते.

मलेरियाची लक्षणे

मलेरिया हा आजार प्लास्मोडियम नावाच्या परजीवीमुळे होतो, जो मादी अनोफिल्स डासांच्या चाव्याव्दारे माणसांमध्ये पसरतो. हा परजीवी यकृतात पोहोचून तिथे वाढतो आणि नंतर लाल रक्तपेशींवर हल्ला करतो, ज्यामुळे गंभीर लक्षणे दिसून येतात. मलेरियाची मुख्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

ताप आणि थंडी: मलेरियाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे थंडी वाजून येणे आणि उच्च ताप येणे. हा ताप अनेकदा सायकलमध्ये येतो, म्हणजे दर 48 किंवा 72 तासांनी पुन्हा येतो.

डोकेदुखी आणि अशक्तपणा: रुग्णाला तीव्र डोकेदुखी, थकवा आणि शरीरात अशक्तपणा जाणवतो.

स्नायू दुखणे आणि मळमळ: स्नायूंमध्ये वेदना, मळमळ आणि उलट्या होणे हेही मलेरियाची लक्षणे आहेत.

अ‍ॅनिमिया आणि कावीळ: गंभीर प्रकरणांमध्ये लाल रक्तपेशींचा नाश झाल्याने अ‍ॅनिमिया आणि कावीळ होऊ शकते.

मेंदूवर परिणाम: गंभीर मलेरियामुळे मेंदूवर परिणाम होऊन रुग्ण बेशुद्ध पडू शकतो, ज्याला सेरेब्रल मलेरिया म्हणतात.

मलेरियाचा सर्वात धोकादायक प्रकार प्लास्मोडियम फाल्सीपेरममुळे होतो, जो मृत्यूचे प्रमुख कारण आहे. लहान मुले आणि गर्भवती महिलांना या आजाराचा धोका जास्त असतो, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते.


मलेरिया रोखण्यासाठी सोप्या टिप्स

1. मच्छरदाणीचा वापर

रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर अवश्य करा. तसेच, विशेषतः मुलांसाठी डास प्रतिबंधक क्रीम किंवा स्प्रे वापरा.

2. पाणी साचू देऊ नका

डास बहुतेकदा स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यात प्रजनन करतात. म्हणून, भांडी, कूलर, टाक्या किंवा इतर उघड्या भांड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका. आठवड्यातून एकदा त्यांना पूर्णपणे स्वच्छ करा.

4. परिसर स्वच्छ ठेवणे

घराभोवती पाणी साठू देऊ नये, कारण डास हे अशा ठिकाणी अंडी घालतात. गटारे आणि डबकी स्वच्छ ठेवावीत.

5. पूर्ण कपडे घाला

संध्याकाळी बाहेर जाताना पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि पूर्ण पँट घाला. डासांपासून स्वतःचे रक्षण करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. हे विशेषतः मुलांसाठी आणि वृद्धांसाठी महत्वाचे आहे.

6. घरी डास नियंत्रणाचे उपाय करा

घराच्या खिडक्या आणि दारांवर मच्छरदाणी लावा आणि मच्छर प्रतिबंधक अगरबत्ती, द्रव किंवा कॉइल वापरा.

7. कीटकनाशकांचा वापर

घरात आणि परिसरात कीटकनाशके फवारणी करावी. तसेच, शरीरावर डास प्रतिबंधक क्रीम लावावे.

8. लवकर निदान आणि उपचार

जर एखाद्याला ताप आला आणि मलेरियासारखी लक्षणे दिसली तर स्वतःहून औषध घेण्याऐवजी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या आणि वेळेवर उपचार सुरू करा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+