World Hypertension Day 2025 ऑफिसात बसून काम करताय; High BPची शक्यता, नियंत्रित करण्यासाठी या 5 टीप्स
World Hypertension Day 2025 High BP risk for desk job holder : आपण म्हणतो की, टेन्शन कुणाला नसते..बहुदा जो जीवन जगतो तो कधी ना कधी तणावात असतो. काहीजण तर नेहमीच तणावात राहतात. त्यातच बदलती जीवनशैली आणि अन्य या कारणामुळे रक्तदाबाची समस्या वाढते. खासकरुन ऑफीसमध्ये काम करणाऱ्या अनेकांना उच्च रक्तदाबाचा आजार चिटकतो.
जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल, तर फक्त रक्तदाब तपासून ताण घेऊ नका उलट हीच वेळ तुमची लढण्याची आहे. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे हे तुमचे आद्य कर्तव्य आहे. आज आपण रक्तदाब नियंत्रित करण्याचे पाच मार्ग जाणून घेऊया या टिप्स तुम्हाला चांगल्या आरोग्यासाठी मदत करतील.

उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्यांनी केवळ औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी जीवनशैली बदलण्याची गरज आहे. यामुळे तुमचा औषधांचा खर्च कमी होईल आणि हळूहळू तुम्ही औषधे घेणे देखील बंद कराल.
1. लिफ्टऐवजी पायऱ्या वापरा
ज्यांना उच्च रक्तदाब आहे आणि ते ऑफिसमध्ये काम करतात. अशांनी लिफ्टऐवजी पायऱ्या वापराव्या. पायऱ्या चढल्याने तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारेल आणि त्याच वेळी तुम्हाला व्यायामही मिळेल. यामुळे हृदयही निरोगी राहील, पण जर तुम्हाला छातीत दुखू लागले किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
2. जास्त कॉफी पिऊ नका
ऑफिसमधील थकवा आणि आळस दूर करण्यासाठी जर तुम्ही जास्त कॉफी पिऊ नये. यामुळे तुमचा रक्तदाब वाढेल. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना बराच काळ या आजाराचा त्रास सहन करावा लागू शकतो. त्याऐवजी ग्रीन टी प्यायला हरकत नाही.
3. घरचे अन्न खा, बाहेरून अन्न मागवू नका
ऑफिसमध्ये बाहेरून अन्न मागवण्याऐवजी घरी आणा. घरगुती अन्नात मीठ, तेल आणि संरक्षक घटक कमी असतात. तसेच तुमच्या जेवणाच्या डब्यात भरपूर फळे आणि भाज्या पॅक करा, जे तुम्ही संध्याकाळी नाश्ता म्हणून खाऊ शकता.
4. खुर्चीवरुन वेळोवेळी उठत राहा
जास्त वेळ सीटवर बसू नका आणि दर अर्ध्या तासाने उठून चालत जा. जास्त वेळ बसल्याने चयापचय कमी होतो आणि त्यामुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह होतो.
5. दबाव आणि तणावापासून दूर राहा
जास्त कामाचा भार घेऊ नका, जेव्हा तुम्हाला दबाव जाणवेल तेव्हा तुमच्या जागेवरून उठा आणि थोडा वेळ चालत जा किंवा तुमच्या मित्रांसोबत याबद्दल बोला. कामावर दबाव असेल पण तो कसा हाताळायचा हे तुम्हाला शिकावे लागेल.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications