world heart day 2024 : घरी बसून हृदयात ब्लॉकेज आहे की नाही हे कसे ओळखावे, या आहेत सोप्या टिप्स
Heart function test at home : आपल्या बदल्या जीवनशैलीमुळे अनेक वेळा आरोग्याच्या समस्या अचानक समोर येतात. अशावेळी आपण गोंधळून जातो. त्यामुळे आरोग्य काळजी घेणे किती महत्वाचं आहे, हे आपल्या नंतर समजतं. त्यामुळे काळजी पोटी आपण आरोग्याच्या टिप्स जाणून घेऊया. आज आपण हृदयाच्या ब्लॉकेज बद्ल काही माहिती जाणून घेणार आहोत. घरी बसून आपलं हृदय निरोगी आहे की, नाही ओळखणं कठीण काम होतं. कारण हृदय संबंधित काही समस्या असतील तर त्या काही टेस्ट केल्याने समजतं. जसं की ईसीजी किंवा इकोकर्डियोग्राफी केल्याने या समस्या आपल्या लक्षात येतात.
हृदयाच्या संबंधित काही सामान्य संकेत किंवा लक्षणावरुन आपण अंदाज लावू शकता की, आपल्या हृदयात ब्लॉकेज आहेत की नाही. अशावेळी आपण गंभीर धोका टाळू शकतो. यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही. फक्त दैनंदिन गोष्टींकडे लक्ष देऊन, तुम्ही हृदयाशी संबंधित समस्या ओळखू शकता. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रील चुघ यांनी सांगितले आहे की, तुम्ही घरी बसून हृदयाची कमजोरी कशी ओळखू शकता.

एका संशोधनानुसार जर एखाद्या पुरुषाच्या कंबरेचा आकार 37 इंचांपेक्षा जास्त असेल तर त्याचे हृदय कमकुवत होऊ शकते. तर महिलांमध्ये ही मर्यादा 31.5 इंच आहे. पुरुषांमध्ये 40 इंच आणि महिलांमध्ये 35 इंच लठ्ठपणा दर्शवतात, ज्यामुळे हृदयाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. लठ्ठपणामुळे खराब कोलेस्टेरॉल निर्माण होतो आणि मग त्यामुळे शिरांमध्ये अडथळे निर्माण होतात.
पायऱ्या चढून शोधा
तुमच्या हृदयाची चाचणी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पायऱ्या चढणे आहे. जर तुम्ही एका मिनिटात 40 पायऱ्या चढल्या तर तुमचे हृदय निरोगी आहे. पण जर तुम्हाला पायऱ्या चढण्यास जास्त वेळ लागला किंवा पायऱ्या चढताना तुम्हाला श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल तर हृदयाची तपासणी करणे खूप आवश्यक आहे.
हृदय गती द्वारे शोधा
पल्स रेट किंवा हार्ट रेट मोजून तुम्ही हार्ट ब्लॉकेज आहे की, नाही हे देखील शोधू शकता. ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या मते, सामान्य परिस्थितीत एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिट 60 ते 100 बीट्सच्या दरम्यान असावेत. तसेच ऍथलीट्समध्ये ते 40-50 च्या दरम्यान असते. श्वास लागणे, चक्कर येणे आणि हृदय गती कमी होणे यासारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
छातीत दुखणे किंवा जडपणा
जेव्हा हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो तेव्हा तुम्हाला छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला जडपणा, दाब किंवा जळजळ जाणवू शकते. ही वेदना शारीरिक श्रम, ताण किंवा जेवण केल्यानंतर उद्भवू शकते आणि विश्रांतीने ती दूर होऊ शकते.
या लक्षणांकडेही दुर्लक्ष करू नका
श्वास घेण्यात अडचण: हृदयात अडथळा असल्यास, हृदयाला योग्यरित्या कार्य करण्यास त्रास होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला श्वासाची कमतरता किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, विशेष म्हणजे शारीरिक हालचाली दरम्यान.
घोट्याला किंवा पायाला सूज येणे:
ब्लॉकेजमुळे हृदय योग्यरित्या रक्त पंप करू शकत नसल्यास, शरीराच्या खालच्या भागात द्रव साचू शकतो, ज्यामुळे पाय किंवा घोट्याला सूज येते.
हात,खांदा किंवा जबडा दुखणे: काहीवेळा ब्लॉकेजची वेदना केवळ छातीतच नाही तर डाव्या हाताला, खांद्यावर, पाठीत किंवा जबड्यातही जाणवते.
चक्कर येणे किंवा बेहोश होणे : ब्लॉकेजमुळे हृदयातील रक्तप्रवाह नीट होत नसेल, तर मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे चक्कर येणे किंवा बेहोश यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
काळजीपूर्वक टिप्स
जर तुम्ही उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल किंवा मधुमेहाचे रुग्ण असाल, तर ही औषधे नियमितपणे घेतल्याने तुम्हाला या परिस्थितींवर नियंत्रण ठेवण्यास आणि अडथळा टाळण्यास मदत होते.












Click it and Unblock the Notifications