World Health Day 2025 : 100 वर्ष जगायचंय? या 6 गोष्टी करा..रोज 3 तासांनी वाढु शकते आयुष्य!
World Health Day 2025 : एखाद्याला आपण आशीर्वाद देताना शंभर वर्ष आयुष्य किंवा आयुष्यमान भव असे म्हणतो. म्हणजेच त्याच्या चिरकाल जगण्यासाठी शुभेच्छा देतो. पण अलिकडे आयुर्मान सत्तरीत पोहचले बहुदा ते साठवरही आले आहे. एकंदरीतच अशा स्थितीत शंभर वर्ष कसे जगायचे दीर्घायुष्य कसे लाभेल हा अनेकांना प्रश्न पडतो.
दीर्घायुष्य सर्वांना जगायचे आहे पण शंभर वर्ष जगता येते का खरंच ही गोष्ट साध्य होते का..तर कुणीही नाही म्हणेल पण अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे शतकापर्यंत तुम्ही पोहचू शकता त्याबाबत डाॅक्टरांनी आणि तज्ज्ञांनी काही सल्ले दिले आहेत. ते जाणून घेऊया.

1. रोज एक तास व्यायाम
व्यायाम हा निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. व्यायामाशिवाय आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकत नाही. त्यामुळे आपण व्यायामाला प्राधान्य द्यायलाच हवे. विशेष म्हणजे चाळीशीनंतर तर व्यायामाची खूपच गरज आहे. त्यामुळे आपण विविध व्याधीवर नियंत्रण ठेवू शकतो किंवा त्या होऊ नये यासाठी व्यायाम महत्वाचाच आहे. नवभारत टाईम्सच्या वृ्त्तानुसार, रोज एक तास व्यायाम केल्यास आपले आयुर्मान रोज तीन तासांनी वाढू शकते असे म्हटले आहे.
2. शाकाहारी भोजन दीर्घ जीवनाची गुरुकिल्ली
जीभ अशी गोष्ट आहे की, त्यामुळे शाकाहार आणि मांसाहार कोण करते हे सांगते. जे प्राणी जीभेने पाणी पितात ते माँसाहारी आणि जे प्राणी तोंडाने पाणी पितात ते शाकाहारी निसर्गानेच या गोष्टी बनवलेल्या आहेत. आपण तोंडाने पाणी पितो मग आपण मुळातः शाकाहारी आहोत पण जीवनपद्धतीच्या बदलामुळे आपण आपला आहार बदलला मांसाहार आणि फास्ट फुडकडे वळत गेलो. डाॅक्टर जास्तकरुन शाकाहाराचाच सल्ला देतात. कधी कधी जे मांसाहार करतात ते मांसाहार करु शकतात 2015 मध्ये टाॅप वैज्ञानिकांनी सल्ला दिला की, शाकाहारी भोजनच सर्वात चांगले आहे. अनेक रोगांची धोके कमी करण्यास ते मदत करते.
3. मद्य न पिणे, दारुला हात लावू नका..
मद्यात अल्कहोल असते आणि डाॅक्टर सांगतात की, अल्कहोल पिल्याने महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची धोका वाढतो. एका अहवालात म्हटले की, मद्याचे थोडेही सेवन आरोग्यासाठी सुरक्षित नाही, म्हणून मद्य पित असाल तर ते सोडा.
4. तंबाखूचे सेवन टाळा
तंबाखू अशी गोष्ट आहे, ज्याचे सेवन केल्याने कर्करोग, फुफुसाचे आजार आणि इतर शारीरीक त्रास होऊ शकतो. डाॅक्टरांनी तंबाखूला आरोग्यासाठी हाणीकारक म्हटले आहे. अल्झाईमरच्या रुग्णांमध्ये तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या खूप कमी असते असे म्हटले जाते तर एका अहवालात तंबाखू सेवन करणाऱ्या लोकांना दीर्घायुष्य लाभत नाही असे म्हटले आहे.
5. साखर, मीठ कमी खा
तज्ज्ञ सांगतात की, साखर कमी खायला हवी. फॅटयुक्त पदार्थाचे सेवन जर कमी केले तरच फायदा होतो. म्हणूनच जीवनशैली योग्य ठेवण्याची गरज असते आणि डाॅक्टरही हाच सल्ला देतात. दीर्घायुष्यासाठी सकस आहार, पालेभाज्या, फळ खावे तर मांस आणि डेअरी उत्पादन टाळावीत. तसेच मिठ आहारात कमी अथवा जास्त नको अगदी हवे तितके योग्य प्रमाणातच मीठ खायला हवे.
स्मोकिंग नकोच
धूम्रपान ही अशी एक गोष्ट आहे ज्यामुळे विविध व्याधी जडते आणि आयुष्य कमी होते. त्यामुळे तज्ज्ञ सांगतात की, सिगारेट आरोग्यासाठी हाणीकारक आहे.
डिस्क्लेमर : हा लेख केवळ सामान्य माहितीवर आधारीत आहे. वनइंडिया यासंदर्भातील सत्य आणि परिणामांची हमी घेत नाही. त्यामुळे कोणतेही औषध आणि उपाय करण्याआधी तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घ्या.












Click it and Unblock the Notifications